Griha Lakshmi Yojana: महिलांना दर महिन्याला मिळणार ₹२०००; गृह लक्ष्मी योजनेसाठी अर्ज कसा कराल?

Griha Lakshmi Yojana Women Get 2000 Rupees: कर्नाटक सरकारने महिलांसाठी गृह लक्ष्मी योजना राबवली आहे. या योजनेत घरातील प्रमुळ स्त्रीला दर महिन्याला २००० रुपये दिले जातात.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On
Summary

कर्नाटक सरकारची महिलांसाठी खास योजना

गृह लक्ष्मी योजनेत महिलांना मिळते आर्थिक मदत

घरातील प्रमुख स्त्रीला दिले जातात २००० रुपये

केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. त्यानंतर राज्य सरकारनेही महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने जशी लाडकी बहीण योजना राबवली आहे तशीच योजना इतर राज्य सरकारनेही राबवली आहे. कर्नाटक सरकारने महिलांसाठी खास गृह लक्ष्मी योजना सुरु केली आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी! eKYC केल्यानंतरही पैसे मिळणार नाहीत, कारण काय?

कर्नाटकच्या गृह लक्ष्मी योजनेत महिलांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेत थेट कुटुंबातील मुख्य महिलेच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर केले जातात. या योजनेत गरीब कुटुंबातील नागरिकांना मदत केली जाणार आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी ही मदत केली जाते.

या योजनेचा लाभ फक्त कर्नाटकमधील रहिवासी महिलांना मिळणार आहे. एका कुटुंबातील एकाच महिलेला पैसे दिले जाणार आहे. घरातील मुख्य महिलेच्या अकाउंटला पैसे जमा केले जाणार आहेत. महिलेचे वय १८ पेक्षा जास्त असावे.त्यांच्या नावावर रेशन कार्ड असावे. महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे मर्यादेपेक्षा कमी असावे.

Ladki Bahin Yojana
Government Scheme: या राज्य सरकारची खास योजना! मुलींना मिळतात ₹५०,००० रुपये ; वाचा सविस्तर

अर्ज कसा करावा?

सर्वात आधी अधिकृत वेबसाइटवर जायचे आहे. यानंतर गृह लक्ष्मी योजनेचा पर्याय निवडा.

यानंतर रजिस्ट्रेशन करा. तुम्हाला आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर ओटीपी टाका.

यानंतर तुम्हाला सर्व माहिती भरायची आहे. महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करुन अर्ज सबमिट करायचा आहे.

ऑफलाइन अर्ज करण्याची पद्धती

तुम्ही जवळच्या जन सेवा केंद्रात किंवा पंचायत कार्यालयात जाऊन अर्ज करु शकतात. तिथे तुम्हाला अर्जाचा फॉर्म ऑफलाइन पद्धतीने भरायचा आहे. याला कागदपत्रे जोडायची आहे. ही सर्व कागदपत्रे आणि फॉर्म संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करायची आहेत.

Ladki Bahin Yojana
Government Scheme: मुलगी १८ वर्षांची झाल्यावर मिळणार १.५० लाख रुपये, अर्थसंकल्पात मोठी घोषणा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com