Aadhar-Voter ID Link: आधार कार्ड-मतदान ओळखपत्र लिंकसंदर्भात मोठी अपडेट, शेवटची तारीख कधी?

Aadhar-Voter ID Link Update: केंद्र सरकारने आधार कार्ड आणि वोटर आयडी लिंकबाबत मोठी अपडेट दिली आहे. आधार कार्ड आणि वोटर आयडी लिंक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आधार कार्ड आणि वोटर आयडी लिंक करणे बंधनकारक नसल्याचे सांगण्यात आले आहे.
Aadhar-Voter ID Link
Aadhar-Voter ID LinkSaam Tv
Published On

Aadhar-Voter ID Link Last Date:

केंद्र सरकारने आधार कार्ड आणि वोटर आयडी लिंकबाबत मोठी अपडेट दिली आहे. मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी काल लोकसभेत याबाबत माहिती दिली. नागरिकांना आधार कार्ड आणि वोटर आयडी लिंक करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

आधार कार्ड आणि वोटर आयडी लिंक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, आधार कार्ड आणि वोटर आयडी लिंक करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे टार्गेट देण्यात आले नाही.

भारताच्या निवडणूक आयोगाने यासंदर्भात माहिती दिली आहे की, EPIC शी आधार कार्ड लिंक करणे अजून सुरू झाले नाही. याशिवाय फॉर्म 6B जमा करण्याची मुदत एका वर्षासाठी वाढवण्यात आली आहे. आधार कार्ड आणि वोटर आयडी लिंक करणे बंधनकारक नाही आहे. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार वोटर कार्ड आणि आधार कार्ड लिंक करु शकतात.

वोटर आयडी आणि आधार कार्ड लिंक फॉर्म

तुम्हाला जर वोटर आयडी आणि आधार कार्ड लिंक करायचे असेल तर तुम्हाला फॉर्म 6B सबमिट करावा लागेल. हा फॉर्म सबमिट करण्याची अंतिम मुदत मार्च २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

Aadhar-Voter ID Link
LPG Gas Cylinder Insurance : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! गॅस सिलिंडरवर मिळणार ६ लाखांचा विमा, दुर्घटनेनंतर मिळणार नुकसान भरपाई

वोटर आयडी महत्त्वाचे

भारतीय निवडणूक आयोग संविधानाच्या कलम ३२४ अंतर्गत मतदार याद्या तयार करणे यासाठी वोटर आयडी असणे महत्त्वाचे आहे. आयोगाच्या महणण्यानुसार, हा डेटा खूप जास्त महत्त्वाचा असतो. त्यामुळे वोटर आयडी असणे गरजेचे असते. जर मतदार यादीत तुमचे नाव नसेल तर तुम्हाला मतदान करण्याचा अधिकार नसतो.

वोटर आयडी आणि आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक नाही

केंद्र सरकारने आधार कार्ड आणि वोटर आयडी लिंक करण्यासाठी एक अॅडवायजरी जारी केली होती. त्यात वोटर आयडी आणि आधार कार्ड लिंक करण्यास सांगितले होते. परंतु याला विरोध करण्यात आला. त्यानंतर वोटरी आयडी आणि आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक नसल्याचे सांगण्यात आले.

Aadhar-Voter ID Link
Gold Silver Rate (9th December 2023): लग्नसराईत सोन्याचा भाव दणकून आपटला, मुंबई-पुण्यात आजचा भाव किती? जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com