LPG Gas Cylinder Insurance Latest Update :
दर महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये बदल करण्यात आला आहे. अशातच एलपीजी सिलिंडरचा वापर करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मागच्या काही महिन्यांपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीने सर्वसामान्यांच्या नाकी नऊ आणले आहे.
व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीमध्ये वाढ होताना दिसून येत आहे तर घरगुती सिलिंडरच्या किमती या स्थिर पाहायला मिळत आहे. अशातच एलपीजी सिलिंडरमुळे दुर्घटना झाल्यास होणाऱ्या नुकसानीची तेल विपणन कंपन्या (OMCs) भरपाई देईल. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी यांसंदर्भात हिवाळी अधिवेशनात सविस्तर माहिती दिली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
1. कोणत्या व्यक्तीला किती विमा मिळणार?
तेल विपणन कंपन्यांसोबत रजिस्टर्ड असणाऱ्या सर्व एलपीजी ग्राहकांना विमा (Insurance) कव्हर दिले जाणार आहे. यामध्ये आगीमुळे मृत्यू झाल्यास प्रति व्यक्तीस सहा लाख रुपयांचे अपघात कव्हर दिले जाईल. त्यात प्रति व्यक्तीला कमाल दोन लाख रुपयांसह (Money) घटनेसाठी ३० लाख रुपयांपर्यंत तेल विपणन कंपन्या देणार आहे. यामध्ये मालमत्तेचे नुकसान झाल्यास दोन लाख रुपयांपर्यंतचा कव्हर मिळेल.
2. LPG विम्या कव्हर मिळवण्यासाठी काय कराल?
जर तुमच्या इथे एलपीजीमुळे दुर्घटना झाल्यास सर्वप्रथम तेल विपणन कंपनीना कळवा.
वितरकाकडून तेल विपणन कंपनीच्या कार्यालयाला माहिती देण्यात येईल.
ज्यावर तेल विपणन कंपनीचे कार्यालय विमा कंपनीला माहिती देईल
त्यानंतर संबंधित विमा कंपनी विमा पॉलिसींच्या तरतुदीनुसार निर्णय घेईल.
3. एलपीजी सिलिंडरची किंमत किती?
तेल विपणन कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत बदल करत असते. यंदा सरकारने घरगुती सिलिंडरच्या किमतीत २०० रुपये कमी करण्याची घोषणा केली. याशिवाय उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एलपीजी सिलिंडरवरली सबसिडीमध्ये ही वाढ करण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.