Railway Recruitment: सावधान! रेल्वे भरतीचा हा फॉर्म चुकूनही भरू नका; बोगस Recruitmentची जाहिरात व्हायरल

Railway Recruitment: १८ हजार जागा या लोको पायलटसाठी तर ११ हजार जागा या तांत्रिक विभागात निघालीये.
Railway Recruitment
Railway RecruitmentSaam TV
Published On

Railway Recruitment Loco Pilot:

भरती संदर्भात एक मेसेज सध्या व्हायरल होत आहे. हा मेसेज कदाचित तुम्ही व्हॉट्सअप किंवा फेसबूकवर वाचलेला असू शकतो. या मेसेजमध्ये रेल्वेत बंपर नोकरभरती निघाल्याचा दावा करण्यात आला होता. भारतीय रेल्वेत जागा निघालीये. एक नाही दोन नाही, तर तब्बल २९ हजार पदांसाठी भरती निघाली आहे. १८ हजार जागा या लोको पायलटसाठी तर ११ हजार जागा या तांत्रिक विभागात निघालीये. हे आम्ही नाही तर केंद्र शासनाने म्हटलंय. केंद्र शासनाने तसं परिपत्रकच काढलंय. पण एक मिनिट थांबा. शासनाने काढलेलं हे परिपत्रक खरंय की नाही? याबाबतची आता धक्कादायक माहिती समोर आलीये. (Latest Marathi News)

Railway Recruitment
Sa Re Ga Ma Pa Little Champs: पुन्हा एकदा वाहणार सप्तसुरांचे वारे; ‘सारेगमप लिटिल चॅम्प’ येणार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

सरकारी नोकरी म्हटलं की अनेक जण त्यासाठी प्रयत्न करतात. अनेक उमेदवार इतर खासगी संस्थेत नोकरी न बघता, सरकारी नोकरीसाठी वर्षानुवर्ष तयारी करतात. घरची गरीब परिस्थिती असूनही अनेक पालक आपल्या मुलांवर कमावण्यासाठी दबाव टाकत नाही. कारण कधीतरी आपल्या मुलाला किंवा मुलीला सरकारी नोकरी मिळेल अशी त्यांना आशा असते.

पण याचाच अनेक जण गैरफायदा घेतात आणि या मुलांची फसवणूक करू पाहतात. आता असंच एका सरकारी नोकरीची जाहिरात व्हायरल झालीये. त्यात भारतीय रेल्वेत लोको पायलटसाठी १८ हजार २३ आणि तांत्रिक विभागासाठी ११ हजार २९ जागा निघाल्याचं म्हटलंय. आता ही जाहिरात पाहून अनेकांच्या आशा जागृत झाल्या असतील. अनेक उमेदवारांनी जोमाने तयारीही केली असेल. पण सरकारी नोकरीची ही जाहिरोत खोटी निघालीये. खुद्द सरकारने याची खातरजमा केलीये. आणि उमेदवारांची फसवणूक होऊ नये म्हणून स्पष्टीकरण दिलंय.

पीआयबीने ट्विटरवर एक एक फोटो पोस्ट केलाय. रेल्वे भरतीची एक जाहिरात व्हायरल होतेय, पण ही जाहिरात खोटीये असं पीआयबीने म्हटलंय.

आता पीआयबी म्हणजे काय? तर पीआयबी म्हणजे प्रेस इन्फोर्मेशन ब्युरो. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्यातून या पीआयबीचं काम चालतं. पीआयबीने आता फॅक्ट चेकचंही काम आता हाती घेतलंय. कारण अनेकजण सरकारच्या नावाने खोटे दावे करतात. तेव्हा पीआयबी पुढाकार घेऊन या दाव्यांवर स्पष्टीकरण देते.

पीआयबीने पुढाकार घेऊन ही जाहिरात खोटी असल्याचं स्पष्ट केलंय. सरकारच्या नावाने अनेक जाहिराती व्हायरल होतात. त्यामुळे उमेदवारांनी अशा कुठल्याही जाहिरातीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नये. अशा जाहिराती पारखून घ्याव्यात. जर तुम्ही अशा जाहिरांतीवर विश्वास ठेवलात तर तुमची फसवणूक तर होईलच आणि तुमच्या खिशालाही फटका बसेल. आणि केलेल्या सगळ्या मेहनतीवर पाणी फेरलं जाईल.

Railway Recruitment
Kalyan Crime News: धक्कदायक! कल्याणमध्ये महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न, शहरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com