सोन्या आणि चांदीच्या भावात मागील आठवड्याभरापासून पतझड पाहायला मिळाली. सोमवारी सोन्याच्या भावाने उच्चांकाची पातळी गाठली होती. अशातच आज सोन्याच्या भावात किंचित घसरण झालेली पाहायला मिळाली आहे.
सणासुदीच्या काळात सोन्याचे भाव काही प्रमाणात नरमले होते. इस्त्राइल-हमास युद्धामुळे सोन्याच्या भावात वाढ झालेली पाहायला मिळाली. अशातच वर्षाच्या शेवटच्या महिन्यात सोन्याच्या भावात उसळी पाहायला मिळाली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सोमवारी सोन्याच्या भावाने ६४ हजांराचा टप्पा ओलांडला होता तर आज सोन्याचा भाव ६२ हजारांवर पोहोचला आहे. यामध्ये २००० रुपयांनी घसरण झालेली पाहायला मिळाली.
येत्या नवीन वर्षात सोन्याचा भाव ७० हजारांचा टप्पा ओलांडू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे गुंतवणूकीसाठी हा काळ अतिशय योग्य देखील समजला जात आहे. २४ कॅरेटनुसार सोन्याच्या (Gold) आजचा भाव किती जाणून घेऊया.
गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,७३० रुपये मोजावे लागणार आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६२,५०० रुपये मोजावे लागतील. तसेच चांदीच्या किमतीही (Price )घसरल्या आहेत. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७६,००० रुपये मोजावे लागतील. (Gold Silver Price Today In Marathi)
1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (Gold Rate)
मुंबई (Mumbai)- ६२,३५० रुपये
पुणे - ६२,३५० रुपये
नागपूर - ६२,३५० रुपये
नाशिक - ६२,३८० रुपये
ठाणे - ६२,३५० रुपये
अमरावती - ६२,३५० रुपये
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.