

रोज जवळपास सर्वजण गुगलचा वापर करतात. गुगलवरुन तुम्ही कोणत्याही कानाकोपऱ्यातील माहिती एका क्लिकवर मिळू शकतात. गुगलमुळे अनेक कामे सोपी होतात. दरम्यान, गुगल नेहमीच काही न काही नवीन प्रयोग करत असते. नेहमी युजर्ससाठी नवीन फीचर लाँच करत असते. यामुळे युजर्संना फायदादेखील होतो.
67 नंबर गुगल ट्रेंड (Google Trend 67 Number Trick)
गुगलने नुकतीच इंटरनेटवर एक नवीन ट्रिक व्हायरल केली आहे. याचे नाव आहे 67. ही फक्त एक संख्या नाहीये. यामुळे गुगल युजर्संना स्क्रिनवर काहीतरी वेगळंच पाहायला मिळणार आहे. तुम्ही जर गुगलवर 67 नंबर टाकला तर तुमची स्क्रिन एकदम गोल-गोल फिरायला लागते. सध्या हा ट्रेंड खूप जास्त व्हायरल होत आहे. तुम्हीहीदेखील हे ट्राय करा.
गुगल प्रत्येक दिवशी आपले होमपेज हे दररोजच्या घटनेनुसार बदलते. या आकड्यांचा त्या दिवसाची काहीतरी खास संबंध असतो.जसा की 67 नंबर. 67 नंबर हा इंटरनेट स्लँग टर्म आहे. हा नंबर टाकल्यावर तुमची स्क्रिन आपोआप हलू लागेल. दरम्यान, यामुळे तुमच्या फोनला काही होणार नाही. त्यामुळे काळजी करु नका.
Do a Barrel Roll ट्रिक
Do a Barrel Roll हीदेखील एक ट्रिक आहे. जर तुम्ही हे गुगलवर टाइप केले तर तुमची स्क्रिन पुर्णपणे ३६० डिग्रीमध्ये फिरेल. हे गुगलच्या ईस्टर एग फीचरपैकी एक आहे. यामुळे तुमच्या फोनला कोणतेही नुकसान होणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.