Manasvi Choudhary
दरवर्षीप्रमाणे यंदाही जगातील सर्वात मोठ्या सर्च इंजिन गुगलने यादी जाहीर केली आहे.
या यादीत २०२५ मध्ये भारतात सर्वाधिक सर्च झालेल्या गोष्टींचा समावेश आहे.
यंदा भारतीयांनी सर्वाधिक सर्चिंग केलेलं एआय नेमकं काय आहे हे शोधलं आहे.
गुगलवर सर्वाधिक सर्च झालेले शब्द म्हणजे, आयपीएल, गुगल जेमिनी, अशिया कप, प्रो कबड्डी लीग, महाकुंभ, महिला विश्वचषक,धर्मेंद्र हे आहेत.
एआय संबंधित प्रश्नामध्ये गुगल जेमिनीने आघाडी घेतली आहे. जेमिनी एआय फोटो, चॅटजीपीटी याविषयी सर्वाधिक सर्च केलं गेलं आहे. चॅटजीपीटी घिबली आर्ट इमेज जनरेटर भारतात टॉपमध्ये आहे
जेमिनी फोटो पाहिल्या क्रमांकावर आहे तर घिबली आर्ट स्टाईल फोटो दुसऱ्या क्रमांकावर आहे यानंतर 3 डी मॉडेल ट्रेंड तिसऱ्या क्रमांकावर होता.
जेमिनी साडी ट्रेंड चौथ्या क्रमांकावर होता आणि अॅक्शन फिगर ट्रेंड पाचव्या क्रमांकावर होता.