Google Doodle Equation: गुगल डुडलवर आज गणिताची समीकरणं; जाणून घ्या काय आहे भन्नाट प्रकार

Sakshi Sunil Jadhav

गुगल डुडलचे गणित


आज गुगलच्या होमपेजवर ‘Quadratic Equation’ या प्रसिद्ध गणिती सूत्रावर आधारित रंगीबेरंगी अॅनिमेटेड डुडल दाखवण्यात आलं आहे.

quadratic equation | google

विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता वाढली


हे डुडल पाहताच जगभरातील विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेषतः शाळा सुरू होत असताना ही थीम चर्चेत आली आहे.

Google animation | google

‘ax² + bx + c = 0’ या समीकरणाचा वापर


गुगलने आजच्या डुडलद्वारे या प्रसिद्ध समीकरणाला सलाम केला आहे, जे गणितातील सर्वात मूलभूत पण प्रभावी सूत्रांपैकी एक आहे.

ax2+bx+c=0 | google

शैक्षणिक उद्दिष्ट


नवे डुडल फक्त सुंदर नाही, तर यामध्ये बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. यावर क्लिक केल्यावर वापरकर्त्यांना ‘Google Search AI Mode’ मध्ये quadratic equation चे सोप्या पायऱ्यांमध्ये स्पष्टीकरण मिळतं.

math doodle | google

‘बॅक टू स्कूल’ सिझनशी संबंध


गुगलने हे डुडल खास शाळा सुरू होण्याच्या काळात सादर केले आहे. कारण या काळात ‘how to solve quadratic equation’ सारख्या शोधांमध्ये वाढ होते.

Google homepage | google

गणिताचं महत्त्व अधोरेखित


Quadratic equation हे फक्त बीजगणिताचं मूलभूत सूत्र नाही, तर त्याच्यावर आधारित अनेक संकल्पना भौतिकशास्त्र, अभियांत्रिकी आणि डेटा विश्लेषणात वापरल्या जातात.

quadratic curve | saam tv

वास्तविक जीवनातील उपयोग


गुलने दिलेले समीकरण परबोलाच्या आकाराचं वर्णन करतं. ज्याचा वापर पूल, रस्ते, आणि तंत्रज्ञानाच्या डिझाइनमध्ये केला जातो.

parabola | saam tv

गुगलचा शिक्षणावर भर


या डुडलद्वारे गुगलने पुन्हा एकदा आपलं ध्येय अधोरेखित केलं आहे. कठीण विषय विद्यार्थ्यांसाठी सोप्या आणि आकर्षक पद्धतीने मांडणे.

STEM education

शिक्षणाला नवा रंग

डुडल पाहून अनेकांना त्यांच्या शाळेतील गणिताच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. त्यामुळे गणित पुन्हा एकदा मजेदार आणि आवडीचं बनलं आहे.

Google trends | google

NEXT: Ratalyache Kaap: वरण भातासोबत करा रताळ्याचे कुरकुरीत काप; वाचा सोपी रेसिपी

Ratalyache Kaap Recipe | saam tv
येथे क्लिक करा