Shruti Vilas Kadam
2024–2025 दरम्यान सर्वाधिक सर्च झालेल्या अभिनेत्रींपैकी क्रिती सॅनन अव्वल आहे. तिचे चित्रपट, मुलाखती, फॅशन स्टाईल आणि सोशल मीडिया अपडेट्समुळे तिची लोकप्रियता वाढली आहे.
दीपिका ही नेहमीच सर्वाधिक शोधल्या जाणाऱ्या नावांपैकी एक. तिला 9.1 दशलक्षांहून अधिक सर्च व्हॉल्युम मिळतो.IMDb च्या अनुसार, गेल्या दशकातील सर्वात जास्त सर्च केली गेलेली भारतीय अभिनेत्री दीपिका पादुकोणच आहे.
श्रद्धा कपूरचा सर्च व्हॉल्युम मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तिच्या चित्रपटांबरोबरच तिच्या पर्सनल लाइफबद्दलही यावर्षात खूप चर्चा झाली म्हणून तिला लोक खूप सर्च करतात.
तृप्ती डिमरी "नॅशनल क्रश" म्हणून लोकप्रिय आहे आणि गुगलवरील टॉप सर्चमध्ये सतत दिसते.
टीव्ही आणि OTT वर सक्रिय असलेली हीना खानही मोस्ट सर्च्ड अभिनेत्रींमध्ये आहे. 2024च्या टॉप 10 लिस्टमध्ये तिचा समावेश आहे.
मरठमोळी अभिनेत्री गिरीजा ओकचे निळ्या साडीतील फोटो अचानक व्हायरल झाले आणि ती सोशल मीडियावर "नॅशनल क्रश" म्हणून ओळखली जाऊ लागली. यामुळे ती सर्वात जास्त सर्च होणाऱ्या लिस्टमध्ये आली.