Sakshi Sunil Jadhav
गेल्या काही महिन्यांत एआय टूल्सची लोकप्रियता झपाट्याने वाढली आहे. फोटो एडिटिंग, स्केच तयार करणे, ड्रॉइंग, डिजिटल आर्ट हे सर्व आता काही सेकंदात एआयच्या मदतीने करता येत आहे.
Google चं Gemini हे सध्या यासाठी सर्वाधिक चर्चेत असलेलं टूल असून त्यातून भन्नाट स्केच फोटो तयार करणं अतिशय सोपं झालं आहे. कोणताही अनुभव नसला तरी युजर्स फक्त एका क्लिकमध्ये आपला फोटो सुंदर स्केचमध्ये बदलू शकतात.
चला तर पाहूया Gemini मधून प्रोफेशनल क्वालिटी स्केच-फोटो कसा तयार करायचा? पुढे सोप्या पद्धतीने याच्या स्टेप्स दिल्या आहेत.
Gemini मधून स्केच फोटो तयार करण्याची सोपी पद्धत म्हणजे. सगळ्यात आधी मोबाइल अॅप किंवा वेब व्हर्जनमधून Gemini सुरू करा.
मेसेज बॉक्समध्ये "Create my sketch photo" असे टाइप करा.
तुम्हाला जो फोटो हवा असेल तो फोटो अपलोड करा. त्यासाठी शक्यतो क्लिअर फोटोचाच वापर करावा.
''Make this image into a pencil sketch photo'' किंवा ''Convert into detailed hand-drawn sketch'' असे लिहून घ्या.
काही सेकंदात Gemini तुमच्या फोटोचा स्केच-आउटपुट तयार करतो. पेन्सिल स्केच, चारकोल स्केच, शेडेड स्केच, आर्टिस्टिक लाइन स्केच असे पर्याय मिळतात. तुम्ही याचाही वापर करू शकता.
तयार झालेले स्केच हाय रिझोल्यूशनमध्ये सेव करून सोशल मीडियावर वापरता येतो. अशा पद्धतीने काहीच सेंकदात तुमचा झक्कास फोटो तयार करू शकता.