ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मलई अनेक लोकांच्या घरात खाल्ली जाते आणि काहि लोकांच्या घरी मलाई साठवून तूप बनवले जाते. मलईपासून तूप चांगले आणि स्वादिष्ट बनले जाते.
म्हशीपासून मिळणाऱ्या दुधाची मलाई ही घट्टच पडते परंतू, गाईपासून मिळणाऱ्या दूधाची मलई ही पातळ असते. यामुळे तूप चांगल्या पध्दतीचे बनले जात नाही.
जर तुमच्या घरीही गाईचे दूध येत असेल, तर त्यावर मलईचा घट्ट थर मिळवण्याची एक सोपी ट्रिक आहे ती जाणून घ्या.
सर्वात आधी दूध नीट उकळण्यासाठी ते गॅसवर ठेवा आणि मंद आचेवर गरम करुन घ्या.
दूध गरम करताना जरापण ढवळायचे नाही किंवा चमचा सुध्दा फिरवायचा नाही.असे केल्यास मलाई साठली जात नाही.
दूध उकळल्यावर, त्यावर चाळणीने ठेवा. भांड पूर्णपणे बंद होणारे झाकण वापरू नका.
दुध पुर्णपणे थंड झाल्यावरच फ्रिजमध्ये ठेवा. जर तुम्ही गरम दूध लगेच फ्रिजमध्ये ठेवले तर त्या दूधाला मलई येत नाही.
दूध थंड झाल्यावर रात्रभर फ्रिजमध्ये ठेवा. सकाळी जेव्हा तुम्ही दूध फ्रिजमधून बाहेर काढाल, तेव्हा मलईचा घट्ट थर जमलेला तुम्हाला दिसेल.