ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तिखट मिरची फ्राय हि कमी साहित्यांत तयार होणारी झणझणीत चविष्ट डिश आहे. जेवणासोबत तोंडी लावण्याकरिता ही रेसिपी अप्रतिम आहे.
हिरव्या तिखट मिरच्या, तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळद, मीठ, लाल तिखट, साखर आणि बेसन इ. साहित्य लागते.
मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घ्या. मिरचीच्या मधोमध उभी चीर पाडा. चिर पाडल्यामुळे मिरची व्यवस्थित शिजते आणि तिखटपणासुध्दा कमी होतो.
एका भांड्यात बेसन, मीठ, हळद आणि थोडे पाणी घालून घट्ट मिश्रण तयार करा. हे मिश्रण मिरच्यांवर हलक्या हाताने लावा. जास्तपण लावू नये नाहितर बेसनची चव जास्त लागली जाते.
एक कढई घ्या. कढईत तेल गरम करून मोहरी, जिरे आणि हिंग घाला. फोडणी छान तडतडून फुलल्यावर बेसन लावलेल्या मिरच्या सावकाश तेलात टाका.
आता मध्यम आचेवर झाकण ठेवून मिरच्या शिजवा. मिरच्या मधूनमधून हलवत राहा, म्हणजे बेसन आणि मिरच्या कच्या राहत नाही आणि मिरच्या व्यवस्थित तळल्या जातात.
मिरच्या शिजल्यावर वरून लाल तिखट आणि थोडी साखर घाला. साखरेमुळे चव संतुलित होते आणि झणझणीतपणाला छान गोडसर टच येतो.
झाकण काढून मिरच्या २ ते ३ मिनिटे परतून घ्या, जेणेकरून मिरच्या थोड्या कुरकुरीत होतील. हवे असल्यास वरून कोथिंबीर घालू शकता.
तिखट मिरची फ्राय गरमागरम भाकरी, चपाती आणि वरण-भातासोबत सर्व्ह करा.