ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुम्हालासुध्दा कॉफी प्यायला आवडत असेल तर हिवाळ्यात या तीन प्रकारची कॉफी बनवून तुम्ही पिऊ शकता. जाणून घ्या रेसिपी.
ही कॉफी बनवण्यासाठी , ४० मिली एस्प्रेसो शॉट, २ मोठे चमचे घरी बनवलेले कॅरॅमल सिरप, १२० मिली लो फॅट हॉट मिल्क इ. साहित्य लागेल.
एका कपात २ चमचे कॅरॅमल सिरप घाला, नंतर त्यात एक शॉट एस्प्रेसो टाका. लो फॅट हॉट मिल्क घालून चांगले ढवळा आणि वर दुधाचा फेस घाला.
हे बनवण्यासाठी तुम्हाला ३० ते ४० मिली एस्प्रेसो शॉट, डार्क चॉकलेटचे तुकडे - २-३, लो फॅट हॉट मिल्क - १२० मिली आणि सजावटीसाठी कोको पावडर इ. साहित्य लागेल.
एका कपात डार्क चॉकलेटचे २-३ तुकडे ठेवा. चॉकलेटचे तुकडे वितळवण्यासाठी एक एस्प्रेसो शॉट तयार करा आणि चांगले मिक्स करुन घ्या. मग त्यात लो फॅट हॉट मिल्क घाला.
मग त्यात लो फॅट हॉट मिल्क टाकून मिक्स करुन घ्या. दुधाचा फेस आणि कोको पावडर घालून सर्व्ह करा.
हे बनवण्यासाठी तुम्हाला ३० मिली एस्प्रेसो शॉट, १२० मिली लो फॅट हॉट मिल्क, मध - १ चमचा, हळद पावडर - अर्धा चमचा, दालचिनी पावडर आणि सजावटीसाठी पिस्ता इ. साहित्य लागेल.
एका कपात अर्धा चमचा हळद आणि चिमूटभर दालचिनी घाला, त्यात गरम, फेस असलेले लो फॅटचे दूध ओता आणि चांगले मिसळा. अधिक गोड करण्यासाठी मध घाला.
एस्प्रेसोचा एक शॉट घाला, ते मिसळा आणि दूध फेस, बारीक केलेले पिस्ते व दालचिनी घालून हे पेय सर्व्ह करा.