

नुकत्याच महाविद्यालयाच्या परिक्षा झाल्या आहेत. या परिक्षा संपल्यानंतर आता पुढे काय? असा प्रश्न नेहमीच विद्यार्थांना पडतो. त्यांच्या ही महत्वाची सुवर्णसंधी आहे. तुम्हाला भारतीय विशिष्ठ ओळख प्राधिकरण म्हणजेच (UIDAI)मध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. ही संधी टेक्नोलॉजी, डिझाइन, डेटा सायन्स आणि गणित अशा क्षेत्रांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थांसाठी असणार आहे.
तुम्ही याचा नक्कीच लाभ घेऊ शकता. यामध्ये आणखी काही गोष्टींचा समावेश असेल. तसेच पुढील माहितीत आपण या रिक्त पदांविषयीची आणखी महत्वाची बातमी जाणून घेणार आहोत.
UIDAI ची इंटर्नशिपही बंगळूरुमध्ये होणार असून यामध्ये विविध शैक्षणिक क्षेत्रातल्या विद्यार्थांसाठी रिक्त जागा असणार आहेत. महत्वाचं म्हणजे याचा जास्त फायदा इंजिनिअरिंग आणि टेक्निकल बॅग्राउंड असणाऱ्या विद्यार्थांना होणार आहे. बीटेक, बीई आणि एमटेक शिकणाऱ्या उमेदरवारांना सी, रस्ट, गो लॅंग, जावा, पायथन याचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
ReactJS, React Native, फूल स्टॅक डेव्हलपमेंट त्यामध्ये Android/iOS असे स्किल्स असणाऱ्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. या कॅटेगरीमध्ये 10+4 अशा पदांसाठी रिक्त जागा असणार आहेत.
तुम्ही जर डिझाइनरचे विद्यार्थी असाल तर ही संधी गमावू नका. यामध्ये गणित आणि सांख्यिकीच्या विद्यार्थांसाठी सुद्धा इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध आहेत. याची सुरुवात ही 1 एप्रिल 2026 पासून ते 15 एप्रिल 2026 पर्यंत असणार आहेत. तुम्ही यासाठी '' https://forms.gle/Z3D6ZVvCVb3y6m2d9 '' या गुगल फॉर्मच्या मदतीने अर्ज करु शकता. तसेच त्यामध्ये योग्य आणि खरी माहिती देणे अनिवार्य असणार आहे. ही सुवर्णसंधी कोणत्याच विद्यार्थाने गमावू नका. याने भविष्यात तुम्हाला नक्कीच फायदा होईल. यासंबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही UIDAI च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.