Gold Rate Today: दिवाळीच्या तोंडावर मोठा धमाका! सोनं-चांदीच्या दरात अचानक मोठी घसरण, वाचा सुवर्णनगरीतले आजचे दर

Gold-Silver Rate Today: दिवाळीच्या खरेदीआधी ग्राहकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. जळगावच्या सुवर्ण बाजारात सोनं - चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे.
Gold- Silver Price Drop
Gold- Silver Price Dropmeta ai
Published On: 

जळगाव : दिवाळी हा सण प्रत्येक भारतीय थाटामाटात साजरा करतो. या सणात आणि धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. जळगावच्या सुवर्ण बाजारात आज दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी सोनं-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झालेली आहे. चांदी प्रतिकिलो ८ हजार रुपयांनी, तर सोनं १० ग्रॅम १ तोळं ३ हजार ३०० रुपयांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

सोन्याचा दर १.३८ लाखांवर

शुक्रवारी ३० ऑक्टोबर रोजी जळगावच्या बाजारात १० ग्रॅम १ तोळा सोन्याचा भाव १ लाख ४१ हजार ३०० रुपये होता. शनिवारी त्यात ३००० हजार ३०० रुपयांची घसरण झाली असून सोन्याचा दर १ लाख ३८ हजार रुपयांवर आला. हे दर जीएसटीशिवाय आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. विजयादशमीनंतर सुरू झालेली घसरण या आठवड्यातही काय असल्याचं चित्र आहे.

Gold- Silver Price Drop
PM Kisan Yojana: 24 वा हप्ता आला नाही? शेतकऱ्यांनो, या नंबरवर करा फोन; लगेच कळेल पैसे अडकल्याचे कारण

चांदीच्या दरात ८ हजारांची घसरण

चांदीच्या किंमतीतही मोठी घसरण झालेली आहे. शुक्रवारी १ किलो चांदीचा भाव १ लाख ९० हजार रुपये होता. शनिवारी त्यात ८ हजार रुपयांची घसरण होऊन चांदीचा दर १ लाख ८२ हजार रुपयांवर आला. हे दरही जीएसटीशिवाय आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातल्या घडामोडींचा परिणाम सोनं आणि चांदीच्या किंमतींवर होत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे ग्राहकांचं लक्ष आता पुढच्या दरबदलांकडे लागलं आहे.

Gold- Silver Price Drop
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत महिलांना ४० हजार रुपये मिळणार? सरकारने केला मोठा खुलासा

आठवडाभरातील सोन्या-चांदीचे दर

२५ ऑक्टोबरला सोनं १ लाख ४१ हजार ५०० रुपये आणि चांदी २ लाख २ हजार रुपये होती. तर २८ ऑक्टोबरला सोन्याने १ लाख ४३ हजारांचा टप्पा गाठला होता. त्यानंतर दोन्ही धातूंच्या दरामध्ये घसरण सुरू झाली. ३१ ऑक्टोबरला सोनं १ लाख ३८ हजार, तर चांदी १ लाख ८२ हजार रुपयांवर आली. दिवाळीच्या खरेदीआधी झालेली ही घसरण ग्राहकांसाठी महत्त्वाची ठरत आहे. मात्र, खरेदी करण्याआधी स्थानिक सराफाकडून आजचा अंतिम दर, जीएसटी आणि घडणावळ यांची माहिती नक्कीच घ्यावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.