PM Kisan Yojana: 24 वा हप्ता आला नाही? शेतकऱ्यांनो, या नंबरवर करा फोन; लगेच कळेल पैसे अडकल्याचे कारण

PM Kisan 24th Installment: पीएम किसान योजनेचा २४ वा हप्ता खात्यात जमा झाला नाही? e-KYC, जमीन पडताळणी, Beneficiary Status तपासण्याची सोपी पद्धत जाणून घ्या.
PM Kisan Yojana
PM Kisan Yojanameta ai
Published On: 

PM Kisan 24th Installment: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला ६००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम प्रत्येकी २ हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधून शेतकऱ्यांच्या खात्यात २४ व्या हप्त्याचे पैसे DBT च्या मदतीने पाठवल्याची माहिती आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अजून २ हजार रुपये जमा झालेले नाहीत. तुमच्याही खात्यात पैसे आले नसतील, तर घाबरू नका. काही महत्त्वाच्या गोष्टी तपासून तुम्ही तक्रार नोंदवू शकता.

सर्वात आधी e-KYC आणि जमिनीची माहिती तपासा

पीएम किसान योजनेचा हप्ता अडकला असेल, तर सर्वात आधी तुमची e-KYC पूर्ण आहे की नाही, हे तपासा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी e-KYC पूर्ण असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर जमिनीच्या कागदपत्रांची पडताळणीही झालेली असणं गरजेचं आहे.

PM Kisan Yojana
RBI Plastic Notes : खिशातील १० आणि २० रुपयांच्या नोटा बदलणार? RBI चा मोठा प्लान समोर

जमिनीच्या नोंदींमध्ये त्रुटी असल्यावर किंवा पडताळणी अपूर्ण असल्यावर हप्ता जमा व्हायला अडचणी येऊ शकतात. यासाठी शेतकऱ्यांनी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन Beneficiary Status तपासावा. रजिस्ट्रेशन नंबर टाकून हप्त्याचे स्टेटस समजू शकते.

PM Kisan Yojana
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत महिलांना ४० हजार रुपये मिळणार? सरकारने केला मोठा खुलासा

हप्ता आला नाही? या हेल्पलाइनवर करा तक्रार

e-KYC आणि जमिनीची माहिती योग्य असूनही पैसे जमा झाले नसतील, तर शेतकरी पीएम किसान हेल्पलाइनवर संपर्क साधू शकतात.

- 155261: पीएम किसान हेल्पलाइन

- 011-24300606: पीएम किसान हेल्पलाइन या क्रमांकावर संपर्क करून हप्ता अडकण्याचे कारण आणि पेमेंट स्टेटसबाबत माहिती मिळवता येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.