

नोकरदार आणि पीएफ खातेधारकांसाठी आनंदवार्ता आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) च्या सदस्यांना २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी मिळणाऱ्या व्याजदराबाबत केंद्र सरकारनं महत्वाचा निर्णय घेतला असून, ईपीएफ (EPF) खात्यात जमा रकमेवर ८.२५ टक्के व्याजदराला मंजुरी दिली आहे. त्यामुळे जवळपास ७ कोटी पीएफ सदस्यांच्या खात्यात याच महिन्यात व्याजापोटी मिळणारी रक्कम जमा होणे अपेक्षित आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, अर्थ मंत्रालयाने ईपीएफओच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. याआधी २ मार्च २०२६ रोजी केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीया यांच्या अध्यक्षतेखाली सीबीटीच्या बैठकीत आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी ८.२५ टक्के व्याजदर निश्चित करण्यात आले होते. आता सरकारने मंजुरी दिल्यानंतर ईपीएफओ आपल्या कोट्यवधी सदस्यांच्या खात्यात व्याजापोटी मिळणारी रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे.
EPFO शी संबंधित सूत्रांच्या हवाल्याने अनेक माध्यमसंस्थांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, पीएफ खात्यात जमा पैशांवर मिळणाऱ्या व्याजाची रक्कम जून महिन्यातच जमा होण्याची शक्यता आहे. यावेळी ईपीएफओने आपली डिजिटल यंत्रणा आणखी सक्षम केली आहे. त्यामुळे व्याजदर जमा करण्याची प्रक्रिया आधीपेक्षा अधिक वेगाने आणि पारदर्शक पद्धतीने होणार आहे. ही व्याजापोटी मिळणारी रक्कम खात्यात जमा झाल्यानंतर पीएफ सदस्यांना पासबुकमध्ये याबाबतची माहिती मिळू शकते.
उल्लेखनीय बाब म्हणजे ईपीएफओने सलग तिसऱ्या वर्षी ८.२५ टक्के व्याजदर कायम ठेवले आहे. त्यात कोणताही बदल करण्यात आला नाही. २०२३-२४, २०२४-२५ आणि आता २०२५-२६ या आर्थिक वर्षांसाठी ८.२५ टक्के व्याजदर कायम ठेवला. तर त्याआधी २०२२-२३ मध्ये ८.१५ टक्के व्याजदर निश्चित करण्यात आला होता.
EPFO च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन पासबुक बघता येईल.
UMANG अॅपच्या माध्यमातून बॅलन्स चेक करा.
मिस्ड कॉल सेवेचा वापर कराल.
SMS सेवेच्या माध्यमातून माहिती मिळवा.
यासाठी UAN नंबर अॅक्टिव्ह किंवा आधारशी लिंक असणे गरजेचे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.