PM Jan Dhan Yojana : जनधन खात्यात पैसे नसले तरी मिळणार १० हजार रुपये; मोदी सरकारची मोठी सुविधा

Jan Dhan Account Benefits : प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत पात्र खातेधारकांना १० हजार रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळू शकते.
PM Jan Dhan Yojana
PM Jan Dhan Yojanasaam tv
Published On: 

केंद्र सरकारकडून सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. त्यापैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री जनधन योजना (PM Jan Dhan Yojana). या योजनेच्या माध्यमातून देशातल्या नागरिकांना बँकिंग सुविधांशी जोण्याचा प्रयत्न करण्यात आला. या योजनेअंतर्गत खातेधारकांना खात्यात पैसे नसतानाही १० हजार रुपयांपर्यंतची ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळू शकते. त्यामुळे अचानक आर्थिक अडचण आल्यावर ही सुविधा फायदेशीर ठरू शकते.

काय आहे १० हजार रुपयांची ओव्हरड्राफ्ट सुविधा?

प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत पात्र खातेदारांना १० हजार रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट सुविधा दिली जाते. म्हणजेच खात्यात शिल्लक रक्कम नसली तरी बँकेकडून ठरावीक मर्यादेपर्यंत पैसे काढण्याची परवानगी मिळू शकते. पण, ही रक्कम प्रत्येक खातेदाराला आपोआप मिळत नाही. त्यासाठी बँकेचे नियम आणि योजनेतील पात्रता पूर्ण करावी लागते.

PM Jan Dhan Yojana
Ayushman Card : आयुष्मान कार्ड असूनही 'या' उपचारांचा खर्च मिळणार नाही, रुग्णालयात जाण्यापूर्वी वाचा महत्त्वाची माहिती

कोणाला मिळतो या सुविधेचा लाभ?

जनधन खात्याचे समाधानकारक पद्धतीने किमान सहा महिने व्यवहार केलेल्या पात्र खातेदारांना या सुविधेचा लाभ घेता येतो. खात्याचे नियमित व्यवहार आणि बँकेच्या अटींची पूर्तता महत्त्वाची आहे. त्यामुळे खाते उघडल्यानंतर त्याचा योग्य पद्धतीने वापर करणं महत्त्वाचं आहे.

PM Jan Dhan Yojana
PF Withdrawal Rules : EPFO चा मोठा निर्णय! PF खात्यातून आता 90% पैसे काढता येणार

जनधन खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

जनधन खातं उघडण्यासाठी आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड किंवा रेशन कार्ड यांसारखी ओळखपत्रे आवश्यक असू शकतात. याशिवाय पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा वीज, टेलिफोन आणि पाण्याचे बिल यांसारखा पत्त्याचा पुरावा मागितला जाऊ शकतो. पासपोर्ट आकाराचा फोटो आणि भरलेला खाते उघडण्याचा अर्जही आवश्यक आहे.

कोण उघडू शकतं जनधन खातं?

भारताचा कोणताही नागरिक जनधन योजनेअंतर्गत बँक खाते उघडण्यासाठी अर्ज करू शकतो. ज्यांच्याकडे आधीपासून बँक खाते नाही, त्यांच्यासाठी ही योजना फायदेशीर आहे. या खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची सक्ती नाही. इच्छुक नागरिक बँकेच्या शाखेत किंवा बँक मित्र केंद्रात जाऊन खाते उघडू शकतात. संयुक्त खाते उघडण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.