

सध्या महागाई वाढत चालली आहे. महागाईमध्ये काही गंभीर आजारांच्या उपचाराचाही खर्च वाढलाय. त्यासाठी केंद्र सरकारने आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) सुरू केली आहे. याचा फायदा लाखो गरजू कुटुंबीयांना झाला आहे. पण याचे महत्त्वाचे नियम तुम्ही वेळीच जाणून घेणं महत्वाचं आहे.
आयुष्मान भारत योजनेचा उद्देश हा रुग्णालयात दाखल होऊन कराव्या लागणाऱ्या गंभीर उपचारांचा खर्च कमी करणं हा आहे. त्यामुळे प्रत्येक छोट्या-मोठ्या आजारावर या योजनेचा लाभ मिळत नाही.
सर्दी, खोकला, ताप अशा सामान्य आजारांसाठी फक्त डॉक्टरांचा सल्ला घेणं किंवा नियमिक तपासणी करणं याचा खर्च कव्हर होत नाही.
चेहरा किंवा शरीराचे सौंदर्य वाढवण्यासाठी केल्या जाणाऱ्या कॉस्मेटिक सर्जरीचा खर्च योजनेत मिळत नाही. पण आजार किंवा अपघातामुळे आवश्यक असलेल्या काही रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीला नियमांनुसार लाभ मिळू शकतो.
गर्भधारणेसाठी केल्या जाणाऱ्या अनेक फर्टिलिटी ट्रीटमेंट आणि असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह प्रक्रियांचा सामान्य कव्हरेजमध्ये समावेश नाही.
व्यसनमुक्तीसाठी केल्या जाणाऱ्या काही उपचारांचाही योजनेमध्ये समावेश नाही.
आयुष्मान कार्डाचा लाभ फक्त योजनेशी Empanelled रुग्णालयांमध्ये आणि ठरवलेल्या मेडिकल पॅकेजअंतर्गत मिळतो. संबंधित उपचाराचं पॅकेज मिळत नसेल किंवा रुग्णालय योजनेच्या यादीत नसेल, तर कॅशलेस उपचार मिळण्यात अडचण येऊ शकते.
राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (NHA) सरकारी रुग्णालयांसाठी आरक्षित उपचार पॅकेजची संख्या २३ वरून ११२ करण्याच्या तयारीच असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे काही उपचारांसाठी खासगी रुग्णालयांचा पर्याय मर्यादित होऊ शकतो.
आयुष्मान कार्डधारकांनी उपचारासाठी रुग्णालयात जाण्यापूर्वी संबंधित आजाराचे पॅकेज उपलब्ध आहे का, याची खात्री करा. तर रुग्णालय योजनेशी संलग्न आहे का, हे तपासा. पात्र लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत उपलब्ध असलेले उपचार देण्यास संलग्न रुग्णालयांनी नकार देऊ नये. उपचार नाकारल्यावर अधिकृत तक्रार व्यवस्थेचा वापर करता येतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.