PF Withdrawal Rules : EPFO चा मोठा निर्णय! PF खात्यातून आता 90% पैसे काढता येणार

EPFO Latest News : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) सदस्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. पीएफ खात्यातून पैसे काढण्यासंदर्भात महत्त्वाचा बदल मंजूर झाल्याची बातमी समोर आली आहे.
PF Withdrawal Rules
PF Withdrawal Rulessaam tv
Published On: 

ईपीएफओ (EPFO) बोर्डाने पीएफ खातेदारांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. खात्यातील किमान शिल्लक रकमेची अट २५ टक्क्यांवरून थेट १० टक्क्यांवर आणली आहे. म्हणजेच तुमच्या खात्यात १० लाख रुपये असतील, तर पूर्वी २.५ लाख रुपये अडकून राहायचे; आता फक्त १ लाख रुपये ठेवून तुम्ही गरजेनुसार तब्बल ९ लाख रुपये काढू शकाल. यासोबतच निवृत्तीनंतर एकदम पैसे काढण्याऐवजी हप्त्यांमध्ये पैसे काढण्याची सुविधा देणाऱ्या 'सिस्टिमॅटिक विड्रॉल प्लॅन'लाही मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे उरलेल्या रकमेवर तुम्हाला व्याज मिळत राहील.

आता एखाद्या कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात १० लाख रुपये जमा असतील, तर त्याला आता ९ लाख रुपयांपर्यंत रक्कम काढता येऊ शकते. याआधी २५ टक्के म्हणजेच २.५ लाख रुपये खात्यात ठेवणं गरजेचं असेल तर फक्त ७.५ लाख रुपये काढता येत होते. नव्या नियमामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक गरजेच्या वेळी जास्त पैसे उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

PF Withdrawal Rules
EPFO Pension Hike : पेन्शनधारकांना मोठं गिफ्ट मिळणार? 1,000 रुपयांची पेन्शन थेट 3,000 रुपये होण्याची शक्यता

आता कर्मचाऱ्यांना रिटायरमेंटनंतर पीएफचे पैसे एकदम काढण्याची गरज नाही. पीएफ सदस्यांसाठी आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे सिस्टिमॅटिक विड्रॉल प्लॅन (Systematic Withdrawal Plan) सुरू केला आहे. यामध्ये रिटायरमेंटनंतर पीएफमधली संपूर्ण रक्कम एकाच वेळी काढण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने किंवा ठरावीक हप्त्यांमध्ये पैसे काढता येतील.

PF Withdrawal Rules
Vivah Muhurta 2026: यंदा कर्तव्य आहे! नोव्हेंबरमध्ये उडवा लग्नाचा बार, जाणून लग्नाचे शुभ मुर्हूत

पीएफच्या या सुविधेमुळे गरजेनुसार पैसे वापरता येतील आणि खात्यात शिल्लक राहिलेल्या पात्र रकमेवर नियमानुसार व्याज मिळत राहू शकतं. त्यामुळे रिटायरमेंटनंतर आर्थिक नियोजन करणं जास्त सोपं होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.