BEST Employees : मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी जोरात! ३ नोव्हेंबरला पगारासह मिळणार इतका बोनस

Diwali Bonus 2026 Date : मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांना ३३ हजारांचा दिवाळी बोनस देण्याची तयारी सुरू आहे.
BEST Employees
BEST Employees saam tv
Published On: 

दिवाळीच्या तोंडावर मुंबईतल्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबई महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ३३ हजार रुपयांचा बोनस जाहीर झाल्यानंतर आता बेस्टच्या कर्मचाऱ्यांनाही ३३ हजार रुपये बोनस देण्याची तयारी सुरू झाली आहे. बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी याबाबत माहिती दिली आहे. दुसरीकडे, मुंबई महापालिकेअंतर्गत काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांनाही दिवाळीनिमित्त प्रत्येकी ५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांना ३३ हजारांचा बोनस मिळणार?

मुंबई महापालिकेच्या ९० हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळीसाठी ३३ हजार रुपये बोनस जाहीर करण्यात आलेला आहे. महापौर रितू तावडे यांनी कामगार संघटनांशी चर्चा केल्यानंतर बुधवारी ही घोषणा केलेली आहे.

BEST Employees
Gold Rate Today : दिवाळीपुर्वी सोनं-चांदीच्या किंमती वाढल्या की घसरल्या? सराफा बाजारातल्या आजच्या किंमती जाणून घ्या

मात्र, तोट्यात असलेल्या बेस्ट उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर न झाल्याने त्यांच्यात नाराजी होती. आता बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांनाही ३३ हजार रुपये बोनस देण्यात येईल, अशी माहिती दिली आहे. यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून त्यांच्या निर्देशानुसार लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.

विशेष म्हणजे, गेल्या वर्षीही मुंबई महापालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ३१ हजार रुपये बोनस देण्यात आला होता. त्यामुळे यंदाही कर्मचाऱ्यांना बोनसची अपेक्षा होती.

BEST Employees
MSRTC Card: एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 'या' तारखेपूर्वी हे काम करा, नाहीतर सवलत बंद होणार?

बेस्टकडे निधीची कमतरता

बेस्ट उपक्रम आर्थिक अडचणीत असल्याने बोनस देण्याचा प्रश्न निर्माण झालेला होता. मुंबई महापालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात बेस्टसाठी १ हजार कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. त्यापैकी ५०० कोटी रुपये बेस्टच्या निवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी देण्यासाठी वापरण्यात आले आहेत. उर्वरित ५०० कोटी रुपयांमधून इतर देणी देण्याची प्रोसेस सुरू असून कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबतही निर्णय घेतला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.