MSRTC Card: एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 'या' तारखेपूर्वी हे काम करा, नाहीतर सवलत बंद होणार?

Maharashtra ST Bus : ST बसच्या सवलतीच्या प्रवासासाठी एनसीएमसी कार्ड नोंदणी करा. महिला आणि जेष्ठ नागरिकांसाठी एसटी आगार व बसस्थानकांवर सकाळी नोंदणीची सुविधा आहे.
Maharashtra ST Bus
Maharashtra ST Bussaam tv
Published On: 

तुम्ही एसटीने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही माहिती महत्त्वाची आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्या पात्र प्रवाशांसाठी महत्त्वाचं आवाहन केलं आहे. एसटीच्या विविध प्रवासभाडे सवलतींचा लाभ घेण्यासाठी आता राष्ट्रीय सामान्य गतिशीलता कार्ड (NCMC) नोंदणी करून घेणं आवश्यक आहे. विशेषत: महिला प्रवाशांची नोंदणी नोव्हेंबरअखेर पूर्ण करण्याचं उदिष्ट महामंडळाने ठेवले आहे. त्यामुळे महिला आणि जेष्ठ नागरिकांनी वेळेत कार्ड काढून घ्यावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

महिला आणि जेष्ठ नागरिकांसाठी विशेष मोहीम

एसटी महामंडळाकडून महिला प्रवासी, जेष्ठ नागरिक आणि अमृत जेष्ठ नागरिकांना शासनाच्या नियमानुसार प्रवासभाड्यात सवलत दिली जाते. या सवलतींचा लाभ घेताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी एनसीएमसी कार्ड नोंदणी प्रक्रियेला वेग देण्यात आलेला आहे.

Maharashtra ST Bus
Udta Teer Review: देशभक्ती, कॉमेडी अन् सस्पेन्सचा तडका! आयुष्मान-साराच्या 'उड़ता तीर'चा जाणून घ्या रिव्ह्यू

विशेषत: ग्रामीण भागातल्या महिला आणि जेष्ठ नागरिकांपर्यंत ही सुविधा पोहोचवण्यासाठी विशेष शिबिर आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी पंचायत समिती आणि ग्रामपंचायत कार्यालयांची मदत घेतली जाणार आहे.

Maharashtra ST Bus
Bank Holiday: उद्या ३१ ऑक्टोबरला बँकेत जाण्याआधी थांबा! बँका बंद की सुरू? लगेचच घ्या जाणून

कुठे आणि किती वाजेपर्यंत करता येणार नोंदणी?

पात्र प्रवाशांना एनसीएमसी कार्डासाठी एसटी आगार, बसस्थानके तसेच प्रवाशांच्या सोयीच्या ठिकाणी नोंदणी करता येणार आहे. अधिकृत एजन्सीमार्फत कार्ड नोंदणी आणि वितरणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

नोंदणीचे ठिकाण - एसटी आगार आणि बसस्थानके.

वेळ - सकाळी ७ ते सायंकाळी ७

नोंदणीची मुदत - महिला प्रवाशांसाठी नोव्हेंबरअखेरपर्यंत नोंदणी पूर्ण करण्याचं आवाहन

विशेष सुविधा - ग्रामीण भागात नोंदणी आणि कार्ड वितरणासाठी शिबिरे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.