Gold Rate Today : दिवाळीपुर्वी सोनं-चांदीच्या किंमती वाढल्या की घसरल्या? सराफा बाजारातल्या आजच्या किंमती जाणून घ्या

Gold Price October 30 : दिवाळीच्या तोंडावर महागाई वाढत चालली आहे. पण सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
Gold Rate Today
Gold Rate Todaysaam tv
Published On: 

जळगाव,

संजय महाजन जळगाव

गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या किंमतीत मोठा बदल होताना पाहायला मिळतोय. त्यात दिवाळी-पाडवा अशा सणांमध्ये लोक सोनं-चांदी खरेदी करतात. पण हे भाव सर्वसामान्यांना परवडणारे नसतात. दिलासादायक बाब म्हणजे, जळगावच्‍या सुवर्ण बाजारात आठवडाभरापासून सोने व चांदीचे भावात होत असलेली घसरण आज देखील कायम राहिली. आज सराफ बाजार सुरू होताच मोठी घसरण झाल्‍याचे दिसून आले. यात सोने दीड हजाराने तर चांदीचे भाव तब्‍बल सहा हजार रुपयांनी कमी झाले आहेत. यामुळे खरेदीदारांना मेाठा दिलासा मिळाला आहे.

आंतरराष्‍ट्रीय घडामोडींचा परिणाम सोने व चांदीच्‍या भावात होताना दिसून येत आहे. सोन्याचे आणि चांदीच्या भावात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना हा मोठा दिलासा मिळाला आहे. सुवर्ण बाजारात मागील काही दिवसांपासून सातत्‍याने घसरण होत असल्‍याचे चित्र आहे. मध्‍यंतरी भाव काहीसे वाढले. परंतु, दसर्यानंतर भावात सातत्‍याने घसरण सुरू आहे. दरम्‍यान या आठवड्यात देखील भावात घसरण सुरू आहे. जानेवारी २०२६ च्‍या तुलनेत सोने व चांदीच्‍या भावात मोठी घट आली असून चांदीच्या दरातही मोठी घट झाली आहे.

Gold Rate Today
MSRTC Card: एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 'या' तारखेपूर्वी हे काम करा, नाहीतर सवलत बंद होणार?

चांदीच्‍या भावात सहा हजाराची घसरण

चांदीच्‍या भावात मोठी घसरण झाली असून सोन्‍याचे भाव देखील कमी झाले आहेत. गुरूवारी (ता.२९) सोन्याचा भाव एक लाख ४२ हजार ८०० रुपये (प्रतिदहा ग्रॅम, विनाजीएसटी) होता. शुक्रवारी सुवर्ण बाजार खुला झाल्‍यानंतर सकाळी सोन्‍याचा भाव १ हजार ५०० रुपयांनी कमी होवून सोने एक लाख ४१ हजार ३०० रुपयांवर आले आहेत. तर चांदीच्‍या भावात कालच्‍या तुलनेत तब्‍बल सहा हजार रुपयांनी कमी झाली आहे. गुरूवारी (ता.२९) एक लाख ९६ हजार (प्रतिकिलो विनाजीएसटी) रुपयांवर असलेली चांदी आज एक लाख ९० हजार रुपयांपर्यंत खाली आली आहे.

Gold Rate Today
Udta Teer Review: देशभक्ती, कॉमेडी अन् सस्पेन्सचा तडका! आयुष्मान-साराच्या 'उड़ता तीर'चा जाणून घ्या रिव्ह्यू

गेल्या काही दिवसांतील सोन्या-चांदीचे भाव

तारीख- सोने प्रतिदहा ग्रॅम--- चांदी प्रतिकिलो (विनाजीएसटी)

२५ ऑक्टोबर- सोनंं प्रतिदहा ग्रॅम १ लाख ४१ हजार ५००. तर चांदी प्रतिकिलो २ लाख २ हजार.

२६ ऑक्टोबर- सोनंं प्रतिदहा ग्रॅम १ लाख ४२ हजार- तर चांदी प्रतिकिलो १ लाख ९९ हजार.

२७ ऑक्टोबर- सोनंं प्रतिदहा ग्रॅम १ लाख ४१ हजार ८००. तर चांदी प्रतिकिलो १ लाख ९७ हजार

२८ ऑक्टोबर- सोनंं प्रतिदहा ग्रॅम १ लाख ४३ हजार. तर चांदी प्रतिकिलो १ लाख ९८ हजार

२९ ऑक्टोबर- सोनंं प्रतिदहा ग्रॅम १ लाख ४२ हजार ८००. तर चांदी प्रतिकिलो १ लाख ९६ हजार

३० ऑक्टोबर- सोनंं प्रतिदहा ग्रॅम १ लाख ४१ हजार ३००. तर चांदी प्रतिकिलो १ लाख ९० हजार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.