
ऐन सणासुदीच्या काळात सोन्याचे भाव वाढले आहेत. सोन्याच्या भावाने खरेदीदारांच्या खिशाला चांगलाच फटका बसला आहे. सोन्याचे भाव आता ८० हजारापार गेले आहेत. आता लग्नसराईलादेखील सुरुवात झाली आहे. अनेकांच्या घरात लग्नाची गडबड सुरु आहे. लग्नात सोने-चांदीचे दागिने खरेदी केले जातात. त्यामुळे सोन्याचे भाव वाढल्याने ग्राहकांचे टेन्शन वाझले आहे.
सोन्याचे भाव हा पूर्व आठवडा वाढले आहेत. रोज भाव वाढत आहेत. त्यामुळे सोने खरेदी करावे की नाही हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे. सोन्याचे भाव लवकरच १ लाखांपेक्षा जास्त होतील, असं चित्र आता दिसत आहे. जाणून घ्या सोने-चांदीचे आजचे भाव
२४ कॅरेट सोन्याची किंमत
आज १ ग्रॅम सोन्याची किंमत ८,७७१ रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ७०,१६८ रुपये आहे. १० ग्रॅम म्हणजेच १ तोळा सोन्याची किंमत ८७,७१० रुपये आहे. आज १ तोळा सोन्याची किंमत ५५० रुपयांनी वाढली आहे.
२२ कॅरेट सोन्याची किंमत
आज २२ कॅरेट सोन्याची किंमतदेखील वाढली आहे.१ ग्रॅम सोन्याची किंमत ८०४० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ६४,३२० रुपये आहे. एक तोळा सोन्याची किंमत ८०,४०० रुपये आहे.
१८ कॅरेट सोन्याची किंमत
आज १ ग्रॅम सोन्याची किंमत ६,५७८ रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ५२,६२४ रुपये आहे. १० ग्रॅम म्हणजेच १ तोळा सोन्याची किंमत ६५,७८० रुपये आहे.
चांदीची किंमत
आज ८ ग्रॅम चांदीची किंमत ७९२ रुपये आहे. १० ग्रॅम चांदी ९९१ रुपयांना विकली जात आहे. तर १०० ग्रॅम चांदीची किंमत ९,९१० रुपये आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.