
सध्या लगीनसराईचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे लग्नाच्या काळात सोने-चांदी घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी होते.नवरीसाठी सोन्याचे दागिने बनवले जातात. परंतु सध्या सोन्याचे वाढ खूप जास्त वाढले आहे. सोन्याचे भाव वाढल्याने खरेदीदारांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे.सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आजदेखील सोन्याच्या भावात ६०० रुपयांनी वाढ झाली आहे.
१ तोळा सोन्याची किंमत लवकरच १ लाख रुपये होईल, असं चित्र दिसत आहे. त्यामुळे येत्या काळात सोन्याच्या किंमती अजूनच वाढण्याची शक्यता आहे. सध्या १ तोळा सोने ८७,९८० रुपये प्रति तोळा विकले जात आहे. त्यात सोन्याचे दागिने बनवायचे असतील तर त्याचे मेकिंग चार्जेस वेगळे द्यावे लागतात. जाणून घ्या सोने-चांदीच्या किंमती.
२२ कॅरेट सोन्याच्या किंमती (Gold Price)
१ ग्रॅम सोन्याची किंमत ८,०६५ रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ६४,५२० रुपये आहे. १ तोळा सोन्याची किंमत ८०,६५० रुपये आहे. २२ कॅरेट सोन्याच्या किंमतीत ५५० रुपयांनी वाढ झाली आहे.
२४ कॅरेट सोन्याची किंमत
आज १ ग्रॅम सोन्याची किंमत ८,७९८ रुपये आहे. ८ ग्रॅम सोने ७०,३८४ रुपये प्रति तोळ्यावर विकले जात आहे. १० ग्रॅम सोन्याची किंमत ८७,९८० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याच्या किंमतीत जवळपास ६०० रुपयांनी वाढ झाली आहे.
१८ कॅरेट सोन्याची किंमत
आज १ ग्रॅम सोने ६,५९९ रुपयांवर विकले जात आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ५२,७९२ रुपये आहे. १ तोळा सोन्याची किंमत ६५,९९० रुपये आहे. १८ कॅरेट सोन्याच्या किंमतीत ४५० रुपयांनी वाढ झाली आहे.
चांदीची किंमत (Silver Rate)
आज ८ ग्रॅम चांदीची किंमत ७८४ रुपये आहे. १० ग्रॅम चांदीची किंमत ९८० रुपये आहे. तर १०० ग्रॅम चांदीची किंमत ९,८०० रुपये आहे. आज चांदीच्या किंमतीत कोणतीही वाढ झालेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.