

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं झालं स्वस्त
प्रति तोळ्यामागे ८१० रुपयांनी घसरण
सोन्याचे दर घसरल्याने सर्वसामान्यांना दिलासा
सोने-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. सोन्याच्या दरात सातत्याने बदल होत असल्याने सोनं खरेदी करावं की नाही असा प्रश्न पडला आहे. सोन्याचे दर मागच्या आठवड्यात घसरले होते. त्यानंतर पुन्हा हे दर वाढले होते. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर घसरले आहेत.सोन्याचे दर घसरल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
सध्या लग्नसराईचे दिवस सुरु आहे. या कालावधीत सोन्याचे दर घसरावे, अशी अपेक्षा सर्वसामान्यांना आहे. आज हे दर घसरले आहेत त्यामुळे सोनं खरेदी करण्याची तुमच्याकडे चांगली संधी आहे. आज सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ८१० रुपयांनी घसरले आहेत. वाचा २२ अन् २४ कॅरेट सोन्याचे दर
आजचे सोन्याचे दर (Today Gold Rate)
आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ८१० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,४७,२८० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ६४८ रुपयांनी घसरले असून १,१७,८२४ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोनं ८१०० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे दर १४,७२,८०० रुपये झाले आहेत.
२२ कॅरेट सोन्याचे दर (22K Gold Rate)
आज २२ कॅरेट सोन्याचे दर ७५० रुपयांची घसरण झाली आहे. हे दर १,३५,००० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ६०० रुपयांनी घसरले आहेत हे दर १,०८,००० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ७,५०० रुपयांनी घसरले असून हे दर १३,५०,००० रुपये झाले आहेत.
१८ कॅरेट सोन्याचे दर (18K Gold Rate)
आज १८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ६१० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,१०,४६० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ४८८ रुपयांनी घसरले आहेत. हे दर ८८,३६८ रुपये झाले आहेत.१० तोळ्यामागे सोन्याचे दर ६१०० रुपयांनी घसरले असून हे दर ११,०४,६०० रुपये झाले आहेत. सोन्याचे दर घसरल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.