Gold-Silver Price: सोनं २४५२९, तर चांदीचे दर ६८२१० रुपयांनी घसरले, महिन्याभरात दरात मोठी पडझड

Gold-Silver Price: जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दर का घसरत आहेत आणि गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ आहे, हे जाणून घ्या.
Gold-Silver Price:
Gold and silver prices see a steep fall as global tensions impact the precious metals market.saam tv
Published On

इराण युद्धामुळे व्यापार जगात चिंतेचे वातावरण आहे. युद्धामुळे सोने-चांदीच्या किमतींमधील वाढ थांबली तर आहेच शिवाय दरामध्ये वेगाने घसरणही झाली आहे. युद्ध सुरू झाल्यापासून २४-कॅरेट सोन्याच्या किमतीत २४,५२९ रुपयांची घट झाली आहे. तर चांदीच्या दरात ६८२१० रुपयांची घसरण झाली आहे. बाजार बंद असल्यामुळे २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी सोने-चांदीचे दर स्थिर राहिले आहेत. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने जाहीर केलेल्या दरांनुसार, २ मार्च रोजी सायंकाळी २४-कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १६७,४७१ रुपये होता.

Gold-Silver Price:
Online Payment: ऑनलाइन पेमेंट करण्याची पद्धत बदलणार, नव्या बदलाचे काय होणार फायदे

शुक्रवारी संध्याकाळी सोन्याचे दर १,४२९४२ रुपयांच्या पातळीवर पोहोचला होता. तर चांदीचे दर २ मार्चच्या संध्याकाळी २८९८४८ रुपये प्रति किलो होता. तर शुक्रवारच्या संध्याकाळी चांदीचे दर घसरत २२,१६४७ प्रति किलोग्रॅमवर पोहोचले होते.

या आठवड्यात सोने आणि चांदीच्या दरात वाढ

२३ मार्च रोजी १० ग्रॅम सोन्याचा भाव प्रति किलोग्राम ₹१,३५,१४१ होता. शुक्रवारी संध्याकाळी हे दर वाढून प्रति १० ग्रॅम ₹१,४२,९४२ झाला होते. गेल्या पाच दिवसांत दरात ७८०१ रुपयांची वाढ झाली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला ₹२०१,५००असलेला चांदीचा भाव शुक्रवारी ₹२२१,६४७ वर पोहोचला, म्हणजेच २०,१४७ ने दरवाढ झाली. युद्धाच्या संदर्भातील अनिश्चितता कायम आहे. हे यु्द्ध संपवण्यासाठी अमेरिका किंवा इराण यांपैकी कोणीही ठोस पाऊल उचलत नाहीये. गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात आहेत आणि अशा परिस्थितीत सोने हा एक आश्वासक पर्याय आहे.

Gold-Silver Price:
Gold Rate Today: घसरणीनंतर सोनं महागलं, सोन्याच्या दरात २२०० रुपयांनी वाढ, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com