Gold Rate Today: सोन्याचे दर पुन्हा घसरले; १० तोळ्यामागे २९,४०० रुपयांची घसरण, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे भाव

Gold Rate Today Fall: सोन्याचे दर आज पुन्हा एकदा घसरले आहेत. सोन्याचे दर सतत घसरत असल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळत आहे. आज सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे २९४० रुपयांनी घसरले आहेत.
Gold Rate Today
Gold Rate TodaySaam tv
Published On
Summary

सोन्याचे दर पुन्हा घसरले

१ तोळ्यामागे २,९४० रुपयांची घसरण

सोन्याचे दर घसरल्याने सर्वसामान्यांना दिलासा

सध्या सणासुदीचे दिवस आहेत. काही दिवसातच पुन्हा एकदा लग्नसराईला सुरुवात होईल. या काळात सोने खरेदीसाठी जास्त गर्दी होते. त्यामुळे तुम्हालाही सोनं खरेदी करायचे असेल तर ही सुवर्णसंधी आहे. सोन्याचे दर आज पुन्हा एकदा घसरले आहेत. सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे २,९४० रुपयांनी घसरले आहे. सोन्याचे दर घसरल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

Gold Rate Today
Gold Rate Today: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, १ तोळा सोनं ५९५० रुपयांनी स्वस्त; २४-२२ कॅरेटचे आजचे दर किती?

सोन्याचे दर मागच्या दोन आठवड्यापासून सतत घसरताना दिसत आहे. मागच्या २४ दिवसात सोन्याचे दर २४००० पेक्षा जास्त रुपयांनी घसरले आहेत. कालच्या एका दिवसात सोन्याचे दर १० हजारांनी घसरले होते. तर चांदी २२००० रुपयांनी घसरली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा सोन्याचे दर कमी झाले आहेत. वाचा आजचे सोन्याचे दर

२४ कॅरेटचे दर (24k Gold Rate Today)

२४ कॅरेट सोन्याचे दर १० तोळ्यामागे २९,४०० रुपयांनी घसरल आहेत. १० तोळ्यासाठी तुम्हाला १४,०३,५०० रुपये मोजावे लागणार आहेत. १ तोळ्यामागे २,९४० रुपयांची घसरण झाली आहे. हे दर १,४०,३५० रुपये झाले आहे. ८ ग्रॅममागे २३५२ रुपयांनी घसरण होऊन हे दर १,१२,२८० रुपये झाले आहेत.

२२ कॅरेटचे दर (22K Gold Rate Today)

आज २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १,२८,६५० रुपयांवर आहेत. या दरात २,७०० रुपयांची घसरण झाली आहे. ८ ग्रॅममागे २,१६० रुपयांची घलरण होऊन हे दर १,०२,९२० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे २७,००० रुपयांची घसरण होऊन हे दर १२,८६,५०० रुपये झाले आहेत.

Gold Rate Today
1 Gram Gold Mangalsutra: सोनं परवडत नाही? पण सोन्याचं मंगळसूत्र पाहिजे? ट्राय करा 1 ग्रॅम सोन्याचे ट्रेंडी मंगळसूत्र

१८ कॅरेटचे दर (18K Gold Rate Today)

आज १८ कॅरेटच्या दरात प्रति तोळ्यामागे २,२१० रुपयांची घसरण झाली असून हे दर १,०५,२६० रुपये झाले आहेत.८ ग्रॅममागे सोन्याचे दर १,७६८ रुपयांची घसरण होऊन हे दर ८४,२०८ रुपये झाले आहे. १० तोळ्यामागे २२,१०० रुपयांची घसरण झाली आहे. हे दर १०,५२,६०० रुपये झाले आहेत.

Gold Rate Today
Gold Rate Today : एकाच दिवसात सोनं १० हजारांनी स्वस्त, प्रति तोळा इतक्या रूपयांवर आले, वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com