या व्हिडिओत जो दावा केलाय तो ऐकून भविष्यात सोनं खरेदी करणाऱ्यांना आनंद झाला असेल...कारण, सोनं आता 56 हजारांवर येणार असल्याचा दावा करण्यात आलाय...पण, खरंच सोन्याचा दर एवढा कमी होऊ शकतो का...? कारण, सोनं हा सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय आहे...अनेकांना सोनं आवडतं...काहीजण गुंतवणुकीसाठी सोनं खरेदी करतात...तर हौसेसाठी काहीजण गुंतवणूक करतात...त्यामुळे या दाव्यामागे काय तथ्य आहे...? त्याची आम्ही पडताळणी सुरू केली...
युद्धामुळे सोन्याचा दर वाढेल असा काहींचा अंदाज होता...मात्र, सोनं आता गेल्या 10 दिवसांपासून उतरत चाललंय...त्यामुळं याचं काय कारण असू शकतं...? हे जाणून घेणं गरजेचं आहे...त्याआधी 24 कॅरेट सोन्याचा मागील 10 दिवसांतील दर काय होता...त्यावर एक नजर टाकूयात...
13 मार्च 2026 1,58,306 रुपये
17 मार्च 2026 1,56,538 रुपये
20 मार्च 2026 1,45,396 रुपये
23 मार्च 2026 1,38,220 रुपये
...ही आकडेवारी पाहिली तर 10 दिवसात 20 हजारांनी सोनं स्वस्त झाल्याचं दिसतंय...पण, आणखी 40 टक्क्यांनी सोनं स्वस्त होऊन 56 हजारांवर सोनं येणार का...? सोन्याचा दर कमी होण्याचं कारण काय असू शकतं..? युद्धामुळे सोन्याचा दर उतरतोय का...? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमने शेअर मार्केटचा अभ्यास असलेल्या तज्ज्ञांची भेट घेतली...त्यांना व्हायरल व्हिडिओ दाखवला आणि खरंच सोनं 56 हजारांवर येऊ शकतं का...? हे जाणून घेतलं...त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलंय पाहुयात...
सध्याच्या स्थितीत सोनं 56 हजारांवर येणार नाही
सोन्याचा दर कमी होण्यामागे कारणं भरपूर आहेत
सर्व देशातील सेंट्रल बँक भरपूर सोनं घेत होत्या
आता या बँकांनी सोनं घेणं कमी केलंय
युद्धस्थितीत सोन्याचे दर कमी होत आहेतGold Price Crash Claim Goes Viral: Will Rates Really Fall to ₹56,000Gold Price Crash Claim Goes Viral: Will Rates Really Fall to ₹56,000
सोनं थोडंफार कमी होऊ शकतं असा तज्ज्ञांचा अंदाज आहे...मात्र, एकदम 56 हजारांवर सोनं येणार असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय...तरीदेखील तुम्ही सोनं खरेदी-विक्री करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या...व्हायरल व्हिडिओ किंवा मेसेजवर विश्वास ठेवू नका...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.