सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण झाली
24K, 22K आणि 18K सोन्याचे दर घसरले
24 कॅरेटच्या 1तोळा सोन्याच्या दरामध्ये 1,520 रुपयांची घसरण
आज 1 किलो चांदीचे दर 5000 रुपयांनी स्वस्त
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. आज सराफा बाजार उघडातच सोनं-चांदीच्या दरात पुन्हा घसरण झाली त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. ग्राहकांना आज सोनं आणि चांदी खरेदी करण्याची चांगली संधी आहे. गणेशोत्सवाच्या काळात सोनं-चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. आजही सोनं-चांदीचे दर घसल्यामुळे ग्राहकांनी खरेदीसाठी सराफा मार्केटमध्ये गर्दी केली आहे. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १,५२० रुपयांची घसरण झाली. तर आज १ किलो चांदी ५००० रुपयांनी स्वस्त झाली. सोनं-चांदी खरेदी करण्यासाठी जर तुम्ही आज जाणार असाल तर आजचे १८-२२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर आणि चांदीचे दर किती आहेत ते जाणून घ्या...
गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. २४ कॅरेटचे १ तोळा सोनं १,५२० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,५२,६८० रुपये खर्च करावे लागतील. २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १५,२०० रुपयांची घसरण झाली. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना १५,२६,८०० रुपये खर्च करावे लागतील. जर तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करणार असाल तर ते खरेदी करू शकता.
२२ कॅरेट सोन्याच्या दरात देखील आज मोठी घसरण झाली. २२ कॅरेटचे १ तोळा सोनं १,४०० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,३९,०५० रुपये खर्च करावे लागतील. २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १४,००० रुपयांनी घसरण झाली. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना १३,९९,५०० रुपये खर्च करावे लागतील. सोन्याचे दागिने २२ कॅरेटचे बनवले जातात. २२ कॅरेटच्या सोन्याचे दर घसरल्यामुळे आज तुम्हाला दागिने बनवून घेण्याची चांगली संधी आहे.
२४ आणि २२ कॅरेटपाठोपाठ १८ कॅरेट सोन्याच्या दरात देखील आज मोठी घसरण झाली. १८ कॅरेटचे १ तोळा सोनं १,१४० रुपयांनी स्वस्त झालं. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,१४,५१० रुपये खर्च करावे लागतील. २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ११,४०० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना ११,४५,१०० रुपये खर्च करावे लागतील.
दरम्यान, आज सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. आज १ ग्रॅम चांदीच्या दरामध्ये ५ रुपायांनी घसरण झाली आहे. ही चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांना २४५ रुपये खर्च करावे लागतील. तर १ किलो चांदीच्या दरामध्ये तब्बल ५००० रुपयांची घसरण झाली आहे. ही चांदी खरेदीसाठी ग्राहकांना २,४५,००० रुपये मोजावे लागतील. आज तुम्ही सोन्यासोबत चांदीचे दागिने बनवू शकता किंवा गुंतवणूक करू शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.