

गणोशोत्सवाच्या उत्सवात सोनं-चांदीच्या किंमतींनी उसळी घेतली आहे. २४ कॅरेट सोन्याच्या दरात विविध शहरांमध्ये तब्बल १,२६० रुपयांपर्यंत वाढ झाली, तर २२ कॅरेट सोनं १,१५० रुपयांनी महागलं आहे. २० सप्टेंबरच्या सकाळच्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव १,५५,९९० रुपये प्रति १० ग्रॅम, तर मुंबईत १,५५,८४० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
मुंबई आणि कोलकातामध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव १,४२,८५० रुपये, तर २४ कॅरेट सोन्याचा दर १,५५,८४० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. दिल्लीमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर १,४३,००० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. चेन्नई, हैदराबाद आणि पुणे-बेंगळुरूमध्येही २४ कॅरेट सोन्याचा भाव १.५५,८४० रुपये आणि २२ कॅरेट सोन्याचा दर १,४२,८५० रुपये आहे.
अहमदाबाद आणि भोपाळमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर १,५५,८९० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव १,४२, ९०० रुपये आहे. जयपूर, लखनऊ आणि चंदीगडमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर १,५५,९९० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव १,४३,००० रुपये आहे.
सोन्यासोबत चांदीच्या दरातही आठवड्याभरात मोठी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात चांदी तब्बल १०,००० रुपयांनी महागली असून, २० सप्टेंबर रोजी सकाळी चांदीचा भाव २,५५,००० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सिल्व्हरचा भाव ६६.७० डॉलर प्रति औंस आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.