Sakshi Sunil Jadhav
गणरायाच्या विसर्जनाचा दिवस जवळ आला की घरोघरी खास नैवेद्याची तयारी केली जाते. दूध-पोहे, दहीभातासोबत अनेक घरांमध्ये आंबटगोड वाटली डाळ केली जाते. चला याची सोपी रेसिपी जाणून घ्या.
वाटली डाळ करण्यासाठी दोन वाट्या हरभरा डाळ सकाळपासून पाण्यात भिजत ठेवा.
भिजलेली डाळ मिरची, मीठ आणि साखरेसोबत मिक्सरमध्ये बारीक न करता जाडसर फिरवून घ्या.
मिक्स केलेल्या डाळीत एक ते दीड चमचा ताज्या लिंबाचा रस घाला.
बारीक चिरलेली अर्धी वाटी कोथिंबीर डाळीत मिसळल्याने तिची चव आणि सुगंध जास्त खुलतो.
कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद आणि कडीपत्ता घालून खमंग फोडणी तयार करा.
तयार केलेली गरम फोडणी वाटलेल्या डाळीवर घालून सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्या.
लिंबाचा रस आणि साखरेमुळे वाटली डाळीला छान आंबटगोड चव मिळते, त्यामुळे ती अधिक चविष्ट लागते. ही वाटली डाळ काहीशी कैरीच्या डाळीसारखी लागते.
गणपती विसर्जनाच्या दिवशी दूध-पोहे आणि दहीभातासोबत ही खमंग वाटली डाळ नैवेद्यासाठी करता येते.