Sakshi Sunil Jadhav
वाढतं वजन आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी व्यायामासोबत आहाराकडेही लक्ष देणं महत्त्वाचं आहे.
कोमट पाण्यात एक चमचा मध आणि अर्ध्या लिंबाचा रस मिसळून सकाळी घेता येतो.
लिंबू-मधाचे पाणी शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यास मदत करू शकते.
जिरे रात्रभर एका ग्लास पाण्यात भिजवून ठेवून सकाळी ते पाणी गाळून कोमट करून घेता येते.
जिऱ्यामध्ये फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम तसेच काही जीवनसत्त्वे आढळतात.
रात्री एका ग्लास पाण्यात दालचिनी भिजवून ठेवून सकाळी ते पाणी घेण्याचा पर्याय आहे.
वजन कमी करण्यासाठी किंवा आरोग्याशी संबंधित विशेष समस्या असल्यास आहारतज्ज्ञ अथवा डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.