Gold Rate Today : सणासुदीच्या काळात सोनं महागलं, १ तोळ्याची किंमत किती? जाणून घ्या 22k, 18k, 24k चे ताजे दर

Gold Silver Price Today Update News : आजच्या सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर १५,४७५ रुपये प्रति ग्रॅम झाला आहे. जाणून घ्या २४, २२ आणि १८ कॅरेट सोन्याचे आजचे ताजे दर.
Gold Rate Today 24K, 22K and 18K Gold Prices Rise During the Festive Season
Gold Rate Today 24K, 22K and 18K Gold Prices Rise During the Festive SeasonAI Image
Published On
Summary
  • सणासुदीच्या काळात सोन्याच्या दरात वाढ

  • २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा १७० रुपयांची वाढ

  • १० तोळे सोन्याचे दर १५,४७,५०० रुपये

  • ग्राहकांना मोठा फटका बसण्याची शक्यता

सणासुदीच्या काळात सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किमतीत झालेल्या या बदलामुळे सणासुदीच्या खरेदीचे नियोजन करणाऱ्या ग्राहकांच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा १७० रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीनंतर १०० ग्रॅम म्हणजेच १० तोळे २४ कॅरेट सोन्याचा दर १५ लाख ४७ हजार ५०० रुपये इतका झाला आहे. त्यामुळे सोन्याच्या दरातील या वाढीचा थेट परिणाम दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या बजेटवर होऊ शकतो.

सणासुदीच्या काळात सोने, चांदी आणि विविध प्रकारच्या दागिन्यांची खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल मोठ्या प्रमाणात असतो. विशेषतः शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे सणांच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढत असताना सोन्याच्या दरात झालेली वाढ ग्राहकांसाठी महत्त्वाची ठरत आहे. दरम्यान, सोन्याच्या किमतींमध्ये दररोज चढ-उतार होत असतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती, डॉलरच्या तुलनेतील बदल, सोने-चांदीची जागतिक मागणी, पुरवठा तसेच विविध आर्थिक घडामोडींचा सोन्याच्या दरावर परिणाम होत असतो. त्यामुळे सोने खरेदी करण्यापूर्वी सराफा बाजारातील आजचा ताजा दर जाणून घ्या.

Gold Rate Today 24K, 22K and 18K Gold Prices Rise During the Festive Season
Stye Eye Care : डोळ्याला रांजणवाडी येण्याआधी दिसतात 'ही' ६ लक्षणे, वेळीच जाणून घ्या नाहीतर...

२४ कॅरेट सोन्याचे दर (24k Gold Rate Today)

१ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १५,४७५

८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,२३,८००

१० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,५४,७५०

१०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १५,४७,५००

Gold Rate Today 24K, 22K and 18K Gold Prices Rise During the Festive Season
Relationship Tips : तुमच्या पार्टनरला 'या' ७ ट्रिक्स वापरून द्या ‘प्रिन्सेस ट्रीटमेंट’, मूड स्विंग्स झटक्यात होतील गायब

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate Today)

१ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १४,१८५

८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,१३,४८०

१० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,४१,८५०

१०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १४,१८,५००

Gold Rate Today 24K, 22K and 18K Gold Prices Rise During the Festive Season
Heart Attack : जिममध्ये हार्ट अटॅक येण्यापूर्वी दिसतात 'ही' ६ लक्षणे, दुर्लक्ष करू नका नाहीतर....

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate Today)

१ ग्रॅम सोन्याचे आजचे दर ११,६०६

८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर ९२,८४८

१० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,१६,०६०

१०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर ११,६०,६००

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com