दिवाशीमध्ये सोनं-चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. आज भाऊबीजच्या दिवशी सोनं-चांदीच्या दरात मोठा बदल झाला. आज सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आज भाऊबीज असल्यामुळे बहीण-भाऊ एकमेकांना सोन्याचे दागिने भेट देऊ शकतात. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ७१० रुपयांची घसरण झाली. तर १ किलो चांदीच्या दरात ५००० रुपयांची घसरण झाली आहे. आज जर तुम्ही सोनं-चांदी खरेदी करायचा प्लान करत असाल तर आजचे दर किती आहेत ते जाणून घ्या.
गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज भाऊबीजेच्या दिवशी २४- २२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ७१० रुपयांची घसरण झाली. हे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना १,४१,९८० रुपये खर्च करावे लागतील. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ७,१०० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज ग्राहकांना १४,१९,८०० रुपये खर्च करावे लागतील.
आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ६५० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,३२,१५० रुपये खर्च करावे लागतील. २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरात ६,५०० रुपयांची घसरण झाली. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना १३,०१,५०० रुपये मोजावे लागतील.
२४ आणि २२ कॅरेटपाठोपाठ १८ कॅरेटचे सोनं देखील आज स्वस्त झालं आहे. आज १८ कॅरेटचे १ तोळा सोनं ५३० रुपयांनी स्वस्त झाले आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,०६,४९० रुपये खर्च करावे लागतील. १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ५,३०० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज ग्राहकांना १०,६४,९०० रुपये खर्च करावे लागतील.
दरम्यान, आज सोन्यासोबतच चांदी देखील स्वस्त झाली आहे त्यामुळे तुम्ही चांदीचे दागिने देखील खरेदी करून बहीण किंवा भावाला गिफ्ट देऊ शकता. आज १ ग्रॅम चांदी ५ रुपयांनी स्वस्त झाली. त्याचे आजचे दर २०० रुपये आहे. तर १ किलो चांदी ५००० रुपयांनी स्वस्त झाली. ही चांदी खरेदीसाठी २,००,००० रुपये द्यावे लागतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.