Gold Rate Today : आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, चांदीच्या दरात ५००० ची घसरण; वाचा 22k, 24k, 18k सोन्याचे दर

Gold Silver Rate Today Update : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,000 ने कमी झाला असून चांदी ₹5,000 प्रति किलोने स्वस्त झाली आहे. मुंबई, पुणे आणि दिल्लीतील आजचे ताजे सोने-चांदीचे दर जाणून घ्या.
GOLD AND SILVER PRICES FALL SHARPLY TODAY | 24K GOLD DOWN ₹1000, SILVER CHEAPER BY ₹5000 PER KG
GOLD AND SILVER PRICES FALL SHARPLY TODAY | 24K GOLD DOWN ₹1000, SILVER CHEAPER BY ₹5000 PER KGSaam Tv
Published On

सोने चांदी खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सराफा बाजार उघडताच सोने चांदीचे दर घसरलेले पाहायला मिळाले. आज १० तोळं सोन्याचा भाव २४ कॅरेटप्रमाणे १ हजारांनी स्वस्त झालं असून चांदी देखील १००० ग्रॅम मागे ५००० रुपयांनी स्वस्त झाली आहे. सोन्याचे आजचे ताजे दर १ तोळं २४ कॅरेटप्रमाणे १,४६,६२०० रुपये इतकं आहे. दरम्यान १०० ग्रॅम चांदीचे दर २४,५०० इतके आहेत. जाणून घ्या तुमच्या भागातील सोने चांदीचे दर.

२४ कॅरेट सोन्याचे दर (24k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर १४,६६२

  • ८ ग्रॅम: आजचे दर १,१७,२९६

  • १० ग्रॅम: आजचे दर १,४६,६२०

  • १०० ग्रॅम: आजचे दर १४,६६,२००

GOLD AND SILVER PRICES FALL SHARPLY TODAY | 24K GOLD DOWN ₹1000, SILVER CHEAPER BY ₹5000 PER KG
Monsoon Tips : पावसाळ्यात घरात पालींचा वावर वाढला? 'हे' उपाय वेळीच करा नाही तर...

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर १३,४४०

  • ८ ग्रॅम: आजचे दर १,०७,५२०

  • १० ग्रॅम: आजचे दर १,३४,४००

  • १०० ग्रॅम: आजचे दर १३,४४,०००

GOLD AND SILVER PRICES FALL SHARPLY TODAY | 24K GOLD DOWN ₹1000, SILVER CHEAPER BY ₹5000 PER KG
Health Care : जेवल्या जेवल्या लगेच प्रचंड झोप येतेय? तुमच्या ताटातच दडलंय 'हे' मोठं कारण

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर १०,९९७

  • ८ ग्रॅम: आजचे दर ८७,९७६

  • १० ग्रॅम: आजचे दर १,०९,९७०

  • १०० ग्रॅम: आजचे दर १०,९९,७००

GOLD AND SILVER PRICES FALL SHARPLY TODAY | 24K GOLD DOWN ₹1000, SILVER CHEAPER BY ₹5000 PER KG
Health Care : महिनाभर चहा पिणे बंद केल्यास शरीरात कोणते बदल होतात? वाचा

मुंबईसह पुणे आणि दिल्लीत कसे आहेत दर?

मुंबई पुण्यात सोन्याचे दर सारखेच असल्याचे पाहायला मिळत आहेत. गुड रिटनर्स नुसार, मुंबई पुण्यात २४k सोन्याचे दर १४,६६२, २२k सोन्याचे दर १३,४४० इतके आहेत तर, १८k सोन्याचे दर १०,९९७ इतके आहेत. मुंबई पुण्यापेक्षा दिल्लीत सोन्याचे दर तुलनेने जास्त आहेत. दिल्लीत २४k सोन्याचे दर १४,६७७ २२k सोन्याचे दर १३,४५५ इतके आहेत तर, १८k सोन्याचे दर ११,०१२ इतके आहेत.

GOLD AND SILVER PRICES FALL SHARPLY TODAY | 24K GOLD DOWN ₹1000, SILVER CHEAPER BY ₹5000 PER KG
Diabetes : फक्त साखर खाल्ल्यानेच डायबिटीस होतो का? जाणून घ्या महत्त्वाच्या ५ गोष्टी

चांदीचे दर किती? ( Silver Rate Today)

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याप्रमाणे आज सराफा बाजार उघडताच चांदीचे दर सुद्धा घसरले आहेत. १००० ग्रॅम चांदी ५००० रुपयांनी स्वस्त झाली असून तज्ज्ञांच्या अहवालानुसार, पुढील काही दिवसांत चांदीचे दर घसरण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात आजचे ताजे दर.

  • १ ग्रॅम चांदीचे दर २४५

  • ८ ग्रॅम चांदीचे दर १,९६०

  • १० ग्रॅम चांदीचे दर २,४५०

  • १०० ग्रॅम चांदीचे दर २४,५००

  • १००० ग्रॅम चांदीचे दर २,४५,०००

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com