ऐन सणासुदीच्या काळात सोनं खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. भारतीय सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव उच्चांकी पातळीवर स्थिर राहिल्यानंतर दरात कपात होण्यास सुरूवात झाली आहे. आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किमती काहीशा खाली आल्या आहेत. २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ६७० रुपयांची घसरण झाली आहे.
२४ कॅरेट सोन्याचे आजचे दर २४ कॅरेट सोन्याच्या दरात तोळ्याला ६७० रुपयांची घसरण झाली. या घसरणीनंतर २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा १,४९,७०० रुपयांवर आला आहे. १ ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत ६७ रुपयांनी कमी होऊन १४,९७० रुपये झाली आहे.
२२ कॅरेट सोन्यातही कपात २२ कॅरेट सोन्याच्या किमतीतही आज घसरण झाली आहे आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅमचा दर ६०० रुपयांनी कमी होऊन १,३७,२५० रुपयांवर आला आहे. १ ग्रॅम सोन्याची किंमत ६० रुपयांनी कमी होऊन १३,७२५ रुपये झाली आहे.
१८ कॅरेट सोन्याचा भाव काय? १८ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा ४९० रुपयांची घट झाली आहे. यामुळे १० ग्रॅम सोन्याचा दर १,१२,३३० रुपये झाला आहे. १ ग्रॅमसाठी ग्राहकांना ११,२३३ रुपये (४९ रुपयांची कपात) मोजावे लागत आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरची किंमत आणि स्थानिक पातळीवरील मागणीमुळे सोन्याच्या दरात चढ उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांच्या तुलनेत आज झालेल्या या घसरणीमुळे ग्राहकांना काही प्रमाणावर दिलासा मिळाला आहे. दसऱ्याआधी सोन्याच्या दरात घसरण झाल्यामुळे ग्राहकांमध्ये दिलासा आहे.
तुमच्या शहरातील सोन्याचे दर काय? (प्रति ग्रॅम)
पुणे
२४ कॅरेट : ₹१४,९५७
२२ कॅरेट : ₹१३,७१०
१८ कॅरेट : ₹११,२१८
मुंबई
२४ कॅरेट : ₹१४,९५७
२२ कॅरेट : ₹१३,७१०
१८ कॅरेट : ₹११,२१८
लखनौ
२४ कॅरेट : ₹१४,९७०
२२ कॅरेट : ₹१३,७२५
१८ कॅरेट : ₹११,२३३
जयपूर
२४ कॅरेट : ₹१४,९७०
२२ कॅरेट : ₹१३,७२५
१८ कॅरेट : ₹११,२३३
दिल्ली
२४ कॅरेट : ₹१४,९७०
२२ कॅरेट : ₹१३,७२५
१८ कॅरेट : ₹११,२३३
पटना
२४ कॅरेट : ₹१४,९६०
२२ कॅरेट : ₹१३,७१५
१८ कॅरेट : ₹११,२२३
अहमदाबाद
२४ कॅरेट : ₹१४,९६०
२२ कॅरेट : ₹१३,७१५
१८ कॅरेट : ₹११,२२३
कोलकाता
२४ कॅरेट : ₹१४,९५७
२२ कॅरेट : ₹१३,७१०
१८ कॅरेट : ₹११,२१८
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.