CNG Price : पुण्यात महागाईचा भडका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, आता १ किलोसाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये

पुण्यात CNG च्या दरात पुन्हा २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. टॉरेंट गॅसचा जुना ९८.५० रुपये प्रति किलो दर आता १००.५० रुपये झाला असून ७ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून नवे दर लागू झाले आहेत.
CNG Price Increases
CNG Price IncreasesSaam Tv
Published On: 

Pune CNG Price Hike: पुण्यातील ग्रामीण भागात सीएनजी (CNG) पुरवठा करणाऱ्या टॉरेंट गॅस (Torrent Gas) कंपनीने सीएनजीच्या दरात थेट प्रति किलो २ रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात सीएनजीवर वाहने चालवणाऱ्या वाहनधारकांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे. पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे नवीन सुधारित दर ७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२ वाजेपासून संपूर्ण पुणे परिसरात लागू करण्यात आले आहेत.

नवीन दर काय आहेत?

जुना दर: ९८.५० रुपये प्रति किलो

नवीन दर: १००.५० रुपये प्रति किलो

वाढ: २ रुपये प्रति किलो

पेट्रोल डीलर्स असोसिएशन पुणेचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे नवे दर ७ ऑक्टोबरच्या मध्यरात्री १२.०१ वाजेपासून लागू झाले आहेत. या दरवाढीमुळे पुण्यात आता सीएनजीच्या किमतीने शंभरी ओलांडली असून, रोज प्रवास करणाऱ्या आणि व्यावसायिक वाहने चालवणाऱ्या चालकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे.

CNG Price Increases
Ladki Bahin Yojana : आनंदाची बातमी! लाडक्या बहिणींच्या खात्यावर 'या' दिवशी ३,००० येणार? महत्त्वाचं कारण आले समोर

अचानक झालेल्या या दरवाढीमुळे रोज प्रवास करणारे नागरिक, ऑटोरिक्षा चालक, टॅक्सी चालक आणि खाजगी सीएनजी कार मालकांचे मासिक इंधन बजेट कोलमडणार आहे. सणासुदीच्या दिवसांतच इंधनाचे भाव शंभरच्या वर गेल्यामुळे सर्वसामान्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

CNG Price Increases
Graduates Election : बावनकुळे, पटोले, वडेट्टीवारांसह १४ बड्या आमदारांना मतदानाला बंदी! काय आहे कारण?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com