Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ, ग्राहकांच्या खिशाला कात्री; वाचा १८- २२ आणि २४ कॅरेटचे दर

Gold- Silver Price Today: सोनं-चांदीच्या दरात आज मोठा बदल झाला. सोनं आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आजचे सोनं-चांदीचे दर किती ते घ्या जाणून..
Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ, ग्राहकांच्या खिशाला कात्री; वाचा १८- २२ आणि २४ कॅरेटचे दर
Gold Price TodaySaam Tv
Published On
  • सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ

  • २४ कॅरेट सोनं ३८० रुपयांनी महागलं.

  • २२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरातही मोठी वाढ

  • १ ग्रॅम चांदी ५ रुपयांनी महागली

सोनं-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार पाहायला मिळत आहे. या आठवड्यात सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर आहे. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ३८० रुपयांची वाढ झाली आहे. २४ कॅरेटसोबत २२ आणि १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. आज जर तुम्ही सोनं आणि चांदी खरेदी करण्यासाठी जाणार असाल तर आजचे २४,२२ आणि १८ कॅरेट सोन्याचे दर आणि चांदीचे दर किती ते जाणून घ्या...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ३८० रुपयांची वाढ झाली. हे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना १,४४,८२० रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ३८०० रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १४,४८,२०० रुपये खर्च करावे लागणार आहे.

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ, ग्राहकांच्या खिशाला कात्री; वाचा १८- २२ आणि २४ कॅरेटचे दर
Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, आज खरेदीची सुवर्णसंधी; वाचा १८- २२ आणि २४ कॅरेटचे दर

आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी वाढ झाली. २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ३५० रुपयांची वाढ झाली. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १,३२,७५० रुपये खर्च करावे लागतील. तर २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ३५०० रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १३,२७,५०० रुपये खर्च करावे लागतील.

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ, ग्राहकांच्या खिशाला कात्री; वाचा १८- २२ आणि २४ कॅरेटचे दर
Gold Rate Today : ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! सोन्याच्या दरात मोठा बदल; चांदी १०,००० रुपयांनी घसरली; वाचा आजचे ताजे दर

२४ आणि २२ कॅरेट सोन्यापाठोपाठ आज १८ कॅरेटचं सोन्याच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. १८ कॅरेटचे १ तोळा सोनं २९० रुपयांनी महाग झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १,०८,६२० रुपये मोजावे लागतील. तर १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये २९०० रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १०,८६,२०० रुपये खर्च कारवे लागतील.

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ, ग्राहकांच्या खिशाला कात्री; वाचा १८- २२ आणि २४ कॅरेटचे दर
Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ, १० तोळं सोनं ३७,००० रुपयांनी महागलं; चांदीचे दर काय? वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

आज सोन्यासोबत चांदीच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून चांदीचे दर स्थिर होते पण आज दर वाढल्यामुळे चांदी खरेदी करताना खिशाला कात्री लागणार आहे. आज १ ग्रॅम चांदी ५ रुपयांनी महागली असून त्यासाठी २४० रुपये खर्च करावे लागतील. तर १ किलो चांदीच्या दरामध्ये ५००० रुपयांची वाढ झाली आहे. ही चांदी खरेदीसाठी २,४०,००० रुपये खर्च करावे लागतील.

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ, ग्राहकांच्या खिशाला कात्री; वाचा १८- २२ आणि २४ कॅरेटचे दर
Gold Silver Gift : सोने की चांदी? आवडत्या व्यक्तीला काय देणं शुभ ठरेल?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com