Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, आज खरेदीची सुवर्णसंधी; वाचा १८- २२ आणि २४ कॅरेटचे दर

Gold Silver Today Rate: सोनं- चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. १० तोळा सोनं ७७०० रुपयांनी स्वस्त झालं.
Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, आज खरेदीची सुवर्णसंधी; वाचा १८- २२ आणि २४ कॅरेटचे दर
Gold Silver Today RateSaam Tv
Published On
  • सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज

  • आज सोन्याच्या दरात मोठी घसरण

  • १० तोळा सोनं ७७०० रुपयांनी स्वस्त

  • सलग चौथ्या दिवशी सोनं झालं स्वस्त

सोनं-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून मोठे बदल होत आहे. या आठवड्यात सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे आज सोनं खरेदीची चांगली संधी आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ७७० रुपयांची घसरण झाली आहे. २४ कॅरेटसोबत २२ आणि १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील घट झाली आहे. आज जर तुम्ही सोनं खरेदी करण्यासाठी जाणार असाल तर आजचे २४,२२ आणि १८ कॅरेट सोन्याचे दर किती ते जाणून घ्या...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ७७० रुपयांची घसरण झाली. हे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना १,४४,४९० रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ७७०० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १४,४४,९०० रुपये खर्च करावे लागणार आहे.

सोन्याचे दागिने हे २२ कॅरेटमध्ये बनवले जातात. त्यामुळे हे सोनं खरेदीवर ग्राहकांचा भर असतो. आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाली. २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ७०० रुपयांची घसरण झाली. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १,३३,४५० रुपये खर्च करावे लागतील. तर २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ७००० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १३,२४,५०० रुपये मोजावे लागतील.

२४ आणि २२ कॅरेट सोन्यापाठोपाठ आज १८ कॅरेटचं सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाल. १८ कॅरेटचे १ तोळा सोनं ५७० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १,०८,३७० रुपये मोजावे लागतील. तर १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ५७०० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १०,८३,७०० रुपये खर्च कारवे लागतील. आज सोन्याच्या दरात बदल झाला पण चांदीचे दर स्थिर आहेत. आज १ किलो चांदी २,४५,००० रुपयांना विकली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com