Gold Silver Prices : खुशखबर! सोन्याचा दर घसरला, चांदीही नरमली; संपूर्ण आठवड्यात भाव किती होता?

gold silver rates in Marathi : मागील महिनाभरात सोन्याचा दर घसरल्याचे दिसून आले. तर चांदीच्या दरातही घसरण दिसून आली.
gold silver rates
gold rates Saam tv
Published On
Summary

मागील आठवड्यात सोने-चांदीच्या दरात घसरण

ऐन लग्नसराईत सोने स्वस्त झाल्याने ग्राहकांना मिळालाय दिलासा

मागील ४ महिन्यात सोन्याचा दरात ५० हजारांनी घसरण

इराण-अमेरिकेच्या युद्धामुळे सोने-चांदीच्या दरावर परिणाम पाहायला मिळत आहे. मागील आठवड्याभरातही सोने-चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळाला. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर चांदीच्या दरात प्रति किलो २८०८ रुपयांनी वाढ झाली आहे. तर सोन्याच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे.

gold silver rates
Gold-Silver Price: सोनं २४५२९, तर चांदीचे दर ६८२१० रुपयांनी घसरले, महिन्याभरात दरात मोठी पडझड

सोमवार ते शुक्रवारपर्यंत या ५ दिवसांत चांदी १२८२१ रुपयांनी स्वस्त झाली. सोन्याचा भाव ५ दिवसांत १८०० रुपयांनी घसरला. तर १७ एप्रिल रोजी एमसीएक्सवर चांदीच्या दर प्रति किलो २५७१४२ रुपये इतका होता. शुक्रवारी एक किलो चांदीचा भाव २८०८ रुपयांनी वाढून २४४३२१ रुपयांवर पोहोचला. तर मागील ५ दिवसांत चांदीच्या दरात १२८२१ रुपयांनी घसरण झाली.

जानेवारीत चांदीचा भाव पहिल्यांदा प्रति किलो ४ लाखांपर्यंत पोहोचला होता. जानेवारीत चांदीचा भाव प्रति किलो ४,३९,३३७ रुपये इतका झाला होता. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत चांदीचा भाव प्रति किलो १९५०१६ रुपयांनी घसरला आहे. मागील शुक्रवारी चांदीचा भाव प्रति किलो २४३८२५ रुपये इतका होता.

सोन्याचा दर एमसीएक्सवर ५ जून रोजी एक्सपाय होणाऱ्या सोन्याचा भाव मागील शुक्रवारी १०० रुपयांनी वाढून प्रति तोळा १५२७९९ रुपये इतका झाला होता. मागील आठवड्यात १७ एप्रिल रोजी सोन्याचा भाव प्रति तोळा १५४६०९ रुपये इतका होता. तर ५ दिवसांत सोन्याचा दर प्रति तोळा १८१० रुपयांनी घसरला आहे. जानेवारी महिन्यात सोन्याचा भाव प्रति तोळा २ लाखांपर्यंत पोहोचला होता. तेव्हांपासून सोन्याच्या दरात प्रति तोळा ५०१८५ रुपयांनी घसरण झाली आहे.

gold silver rates
Gold Rate : चांदी तब्बल ₹३१००० नी स्वस्त, सोन्यातही मोठी घसरण, वाचा 24k आणि 22k चे दर

ऐन लग्नसराईत सोने-चांदीच्या दरात भाव कोसळल्याने अनेकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर गुंतवणूदारांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच इराण-अमेरिकेतील तणाव आणखी वाढल्यास सोने-चांदीच्या दरावर आणखी परिणाम होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com