

महागाई आणि सतत वाढणाऱ्या किंमती यामुळं सर्वसामान्यांच्या हाताबाहेर गेलेले सोने आणि चांदीची गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली घसरण आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी कायम राहिली. सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगाव शहरातील पेठेत सोने आणि चांदीच्या दरात घसरण नोंदवली. चांदीचा भाव प्रतिकिलोला तब्बल ४ हजार रुपयांनी कमी झाला. तर सोने प्रतितोळा १५०० रुपयांनी स्वस्त झाले.
जळगावच्या सुवर्ण पेठेत गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात घसरण सुरू आहे. सोमवारीही ती कायम राहिली. मागील आठवड्यातील अखेरच्या दिवशी म्हणजेच शनिवारीही सोने-चांदी दरात घट झाली होती. त्यानंतर सोमवारीही किंमती घसरल्या. चांदीनं प्रतिकिलो तब्बल ४ हजार रुपयांची कच खाल्ली. सोन्याचे दरही प्रतितोळ्याला दीड हजार रुपयांनी खाली उतरले. यामुळे ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील आर्थिक घडामोडी, अमेरिकेतील व्याजदर वाढीची शक्यता आणि मजबूत होत असलेला डॉलर याचा थेट परिणाम सोने-चांदीच्या बाजारावर होत असल्याचे सराफा व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांत जागतिक तसेच देशांतर्गत बाजारात मौल्यवान धातूंच्या किंमतीमध्ये सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. त्याचा परिणाम आज, सोमवारी देखील सुवर्ण बाजारात बघायला मिळाला.
सोने– चांदीच्या दरात सातत्याने बदल होत आहे. यात आज (ता. ८) आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दर कमी झाले. सोने प्रतितोळा दीड हजार रुपये स्वस्त झाले. जीएसटीविना दहा ग्रॅम सोन्याचा भाव १ लाख ४९ हजार ५०० रूपये आहे. तर चांदीची चकाकीही कमी झाली आहे. जीएसटीविना चांदी प्रतिकिलो ४ हजार रूपयांनी स्वस्त झाली. चांदीचा भाव प्रतिकिलो २ लाख ४५ हजार रूपयांवर आला आहे.
सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने होत असलेल्या चढ- उतारामुळे गुंतवणूकदार मात्र आखडता हात घेत आहेत. येत्या काळात दर आणखी कमी होणार की पुन्हा वाढणार, याबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळं अनेक गुंतवणूकदार 'थोडी आणखी वाट बघू' या भूमिकेत आहेत. दुसरीकडे दर कमी होत असल्यानं अधिक मासाच्या अखेरच्या आठवड्यात ग्राहकांना सोने-चांदी खरेदीची चांगली संधी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.