can landlord deduct painting charges from security deposit : भाड्याच्या घरात राहणाऱ्या बहुतांश लोकांना घर रिकामे करताना फ्लॅटचा रंग निघाला म्हणून मालक पैसे कट करून घेतो, या मोठ्या समस्येला सामोरे जावे लागते. 'सिक्युरिटी डिपॉझिट'मधून (Deposite) घरमालक अनेकदा पैसे कट करत असतो. घर सोडताना घरमालक भिंतींच्या रंगाचे किंवा पेन्टिंगचे कारण पुढे करून डिपॉझिटमधून हजारो रुपये कापून घेतात. मात्र, कायदा खरोखरच घरमालकाला असा खर्च भाडेकरूकडून वसूल करण्याची परवानगी देतो का? याबाबत भाडेकरूंना आपले कायदेशीर अधिकार माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे.
मॉडेल टेनन्सी ॲक्ट (Model Tenancy Act) आणि भाडे कराराच्या नियमांनुसार, 'सामान्य झीज' (Normal Wear and Tear) म्हणजेच रोजच्या वापरामुळे भिंतींचा रंग थोडा फिका पडणे किंवा जुना होणे, यासाठी घरमालक भाडेकरूचे पैसे कापू शकत नाही. नैसर्गिक कारणांमुळे किंवा वेळेनुसार भिंतींच्या रंगात झालेला बदल ही घरमालकाची स्वतःची जबाबदारी मानली जाते.
जर भाडेकरूने भिंतींचे मोठे नुकसान केले असेल...उदा. भिंतींवर मोठी छिद्रे पाडणे, लहान मुलांनी स्केचपेन किंवा रंगांनी भिंती खराब करणे, अथवा विनापरवानगी भिंतींना वेगळाच रंग लावणे...तरच घरमालक दुरुस्तीचा किंवा पेंटिंगचा रास्त खर्च डिपॉझिटमधून कापू शकतो.
भाडे करारातील (Rent Agreement) अट सर्वात महत्त्वाची:
घर घेताना केलेल्या भाडे करारात (Rent Agreement) जर "घर सोडताना पेंटिंगचा खर्च भाडेकरूने करावा किंवा डिपॉझिटमधून एक महिन्याचे भाडे/ठराविक रक्कम कापली जाईल" अशी स्पष्ट अट असेल, तरच घरमालक ते पैसे कापू शकतो. करारात अशी अट नसेल, तर सामान्य पेंटिंगसाठी पैसे कापणे बेकायदेशीर ठरते. त्यामुळे भाडेकरारावर स्वाक्षरी करताना ही अट तपासून पाहणे अत्यंत गरजेचे आहे.
घरमालकाने विनाकारण पैसे कापल्यास भाडेकरू काय करू शकतो? (Remedies for Tenants):
घरमालक चुकीच्या पद्धतीने पैसे कापत असेल तर त्याला आधी लिखित स्वरूपात किंवा ईमेलद्वारे आक्षेप कळवावा. वाद न सुटल्यास भाडेकरू 'रेंट ट्रिब्यूनल' (Rent Tribunal) किंवा स्थानिक रेंट अथॉरिटीकडे तक्रार दाखल करू शकतो. सेवा त्रुटी (Deficiency of Service) अंतर्गत भाडेकरू ग्राहक न्यायालयातही दाद मागू शकतो.
घरात प्रवेश करताना (Move-in) आणि घर सोडताना (Move-out) भिंती, फर्निचर आणि घराच्या स्थितीचे व्हिडिओ आणि फोटो काढून ठेवावेत. हे पुरावे घरमालकाच्या खोट्या दाव्यांविरोधात उपयुक्त ठरतात. जर घरमालकाने काही नुकसान झाल्याचा दावा केला आणि पैसे कापले, तर भाडेकरूला त्या पेंटिंगच्या किंवा दुरुस्तीच्या अधिकृत बिलाची (Actual Repair Bill/Quotation) मागणी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. घरमालक अंदाजे रक्कम कापू शकत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.