

मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने होणाऱ्या घसरणीला ब्रेक लागला आहे. आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किमतीत मोठी वाढ पाहायला मिळाली. २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेट अशा सर्वच प्रकारच्या सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. १० ग्रॅम सोन्याचा भाव पुन्हा एकदा उच्चांकाच्या दिशेने सरकला आहे. या दरवाढीमुळे खरेदीदारांच्या खिशावर काहीसा ताण वाढणार असला तरी बाजारात पुन्हा एकदा तेजीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
जागतिक बाजारातील घडामोडी आणि मागणीत झालेल्या सुधारणेमुळे सोन्याच्या दरात आज वाढ दिसून येत आहे. २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या भावात थेट १,२०० रुपयांची तर २२ कॅरेट १० ग्रॅमच्या भावात १,१०० रुपयांची वाढ झाली आहे. ऐन सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या काळात सोन्याच्या भावात झालेली ही वाढ ग्राहकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. पण गुंतवणुकीच्या दृष्टीने सोने पुन्हा एकदा मजबूत स्थितीत आले आहे.
१ ग्रॅम: ₹१५,५३५ (₹१२० ने वाढ)
८ ग्रॅम: ₹१,२४,२८० (₹९६० ने वाढ)
१० ग्रॅम (१ तोळा): ₹१,५५,३५० (₹१,२०० ने वाढ)
१०० ग्रॅम: ₹१५,५३,५०० (₹१२,००० ने वाढ)
२२ कॅरेट सोन्याचे दर :
१ ग्रॅम: ₹१४,२४० (₹११० ने वाढ)
८ ग्रॅम: ₹१,१३,९२० (₹८८० ने वाढ)
१० ग्रॅम (१ तोळा): ₹१,४२,४०० (₹१,१०० ने वाढ)
१०० ग्रॅम: ₹१४,२४,००० (₹११,००० ने वाढ)
१८ कॅरेट सोन्याचे दर:
१ ग्रॅम: ₹११,६५१ (₹९० ने वाढ)
८ ग्रॅम: ₹९३,२०८ (₹७२० ने वाढ)
१० ग्रॅम (१ तोळा): ₹१,१६,५१० (₹९०० ने वाढ)
१०० ग्रॅम: ₹११,६५,१०० (₹९,००० ने वाढ)
तुमच्या शहरातील सोन्याचे दर काय?
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये म्हणजेच मुंबई आणि पुण्यात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ₹१५,५३५ आहे, तर २२ कॅरेट सोन्यासाठी ₹१४,२४० आणि १८ कॅरेट सोन्यासाठी ₹११,६५१ भाव आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये सोन्याच्या दरात किंचित वाढ पाहायला मिळत आहे. दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ₹१५,५५० असून, २२ कॅरेटसाठी ₹१४,२५५ आणि १८ कॅरेट सोन्यासाठी ₹११,६६६ दर आहे. दक्षिणेतील प्रमुख शहर असलेल्या चेन्नईमध्ये सोन्याचे दर इतर शहरांच्या तुलनेत सर्वात जास्त आहेत. चेन्नईत २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ₹१५,५६७ वर पोहोचला आहे. तसेच २२ कॅरेट सोन्याचा दर ₹१४,२७० आणि १८ कॅरेट सोन्याचा दर ₹१२,०४० इतका आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.