Discount Offers: स्मार्टफोन, एसी, वॉशिंग मशीन स्वस्तात खरेदी करण्याची संधी; उद्यापासून फ्लिपकार्टचा मोठा सेल सुरू

Flipkart Big Bachat Days Sale: फ्लिपकार्टवर उद्यापासून म्हणजेच १ एप्रिलपासून सेल सुरू होणार आहे. स्वस्तामध्ये स्मार्टफोन, एसी, वॉशिंग मशीन खरेदी करण्याची ही उत्तम संधी आहे. गॅजेट्स, फॅशनपासून ते किराणा सामानापर्यंत अनेक उत्पादनं स्वस्त दरात उपलब्ध होणार आहेत.
Discount Offers
Discount OffersYandex

Smartphone AC Washing Machine Discount Offers

फ्लिपकार्ट (Flipkart) पुन्हा एकदा त्याच्या बिग बचत डे सेलसह परत आलं.. ही विक्री ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उद्यापासून म्हणजेच १ एप्रिलपासून सुरू होत आहे. कंपनीने या सेलची जाहीरात आधीच शेअर केलीय. या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट्सपासून फॅशन, किराणा आणि फर्निचरपर्यंत सर्व गोष्टींवर मोठी सूट मिळणार आहे. उन्हाळा येत आहे, त्यामुळे या सेलमध्ये एसीपासून कूलरपर्यंत सर्वच गोष्टींवर मोठी सूट (Discount Offers) देण्यात येत आहे. (Latest Marathi News)

स्मार्ट टीव्हीवर सूट

फ्लिपकार्ट बिग बचत डे सेल पेजनुसार, स्मार्ट टीव्हीवर सर्वात मोठी सूट देण्यात येणार आहे. सेलमध्ये स्मार्ट टीव्हीची सुरुवातीला किंमत 6,499 रुपये असू शकते. काही ब्रँडेड स्मार्ट टीव्ही या सेलमध्ये अत्यंत स्वस्त दरात मिळतील, अशी अपेक्षा आहे. सोनी आणि मोटोरोला टीव्ही देखील विक्रीदरम्यान अर्ध्या किमतीत उपलब्ध होणार (Flipkart Sale) आहेत.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वॉशिंग मशीनवर सूट

फ्लिपकार्टवर सेल दरम्यान वॉशिंग मशीनवर मोठ्या प्रमाणामध्ये सूट मिळणार आहे. सेल पेजवर दिलेल्या माहितीनुसार आपण 6,990 रुपयांच्या किमतीत सेलमध्ये वॉशिंग मशिन खरेदी करू (Washing Machine Discount Offers) शकतो. सॅमसंग आणि व्हर्लपूल सारख्या कंपन्यांच्या वॉशिंग मशीनवर सध्या 25 टक्के सुट उपलब्ध आहे, ती 40 टक्क्यांपर्यंत वाढू शकते.

स्मार्टफोन स्वस्तात दरात मिळणार

या फ्लिपकार्ट सेलमध्ये स्मार्टफोनवर (Smartphone Discount Offers) देखील मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येणार आहे. कंपनीने याबाबत अद्याप कोणतीही पोस्ट शेअर केलेली नाही. परंतु सेल रू होताच, काही स्मार्टफोन डील येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आयफोनसह अनेक बजेट स्मार्टफोन अत्यंत स्वस्त दरात खरेदीसाठी उपलब्ध होणार आहेत.

Discount Offers
Car Discount offers : कार प्रेमींसाठी खुशखबर! मार्केटमध्ये 'या' कारवर मिळतेय २ लाखांपर्यंत सूट

एसी खरेदी करण्याची उत्तम संधी

सेल दरम्यान एसी आणि कुलरवर सर्वात मोठी सुट देण्यात येणार आहे. 26,490 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत एअर कंडिशनर खरेदी करता येणार आहे. तसंच LG सारख्या ब्रँडचे एसी अर्ध्या किमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार (AC Discount Offers) आहे. यासोबत अनेक इतर गोष्टींवर देखील मोठ्या प्रमाणात सुट देण्यात येणार आहे.

फ्लिपकार्टवर १ एप्रिलपासून सेल सुरू होणार आहे. स्वस्तामध्ये स्मार्टफोन, एसी, वॉशिंग मशीन खरेदी करण्याची ही उत्तम संधी आहे. गॅजेट्स, फॅशनपासून ते किराणा सामानापर्यंत अनेक उत्पादनं स्वस्त दरात उपलब्ध होणार आहेत.

Discount Offers
SBI EMI Offer : फक्त ६७३ रुपयांमध्ये घरी आणा ७५०० रुपयांचा फोन; दिसतोय IPhone सारखा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com