Car Discount offers : कार प्रेमींसाठी खुशखबर! मार्केटमध्ये 'या' कारवर मिळतेय २ लाखांपर्यंत सूट

Car Discount offers : मार्च महिन्यात नवी कार खरेदी करण्याची मोठी संधी आहे. काही कंपन्यांनी कार खरेदीवर मोठी सूट देऊ केली आहे. महिंद्रा ते स्कोडा कंपनीच्या कारवर २ लाखांपर्यंतची सूट मिळत आहे.
Car
Car Saam Tv

Latest Discount Offer on Cars:

मार्च महिन्यात नवी कार खरेदी करण्याची मोठी संधी आहे. काही कंपन्यांनी कार खरेदीवर मोठी सूट देऊ केली आहे. महिंद्रा ते स्कोडा कंपनीच्या कारवर २ लाखांपर्यंतची सूट मिळत आहे. ही सूट फक्त मार्च महिन्यासाठीच मर्यादित आहे. (Latest Marathi News)

Renault Triber, Kwid आणि Kiger कारवर ७० हजारांपर्यंत सूट

मार्च महिन्यात Renault Triber कारवर ५५ हजारांची सूट मिळत आहे. या कारमध्ये स्पेस चांगली आहे. या कार खरेदीवर तब्बल ७० हजारांपर्यंत सूट मिळत आहे. Kwid ची एक्स-शो रूम किंमत ही ४.६९ लाख रुपये आहे. तुम्ही ही कार ५,९९९ रुपयांच्या ईएमआयवर देखील खरेदी करू शकता.

तर Renault Kiger ही कार कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. मार्च महिन्यात या कारमागे ६५ हजार रुपयांची बचत करण्याची संधी आहे. या कारची एक्स-शो रुम किंमत ५.९९ लाख रुपये आहे. ही कार तुम्ही ५,९९९ रुपयांच्या ईएमआयवर खरेदी करू शकता.

Car
Startup Business Idea : टी-शर्ट प्रिंटिंगच्या व्यवसायातून करा बक्कळ कमाई, जाणून घ्या सविस्तर

स्कोडा कारवर २ लाखांपर्यंतची बचत

मार्च महिन्यात स्कोडा इंडिया कार सर्वाधिक सूट देत आहे. स्कोडा Kushaq आणि Slavia कारवर २ लाखांपर्यंतची सूट आहे. ही ऑफर २० मार्चपर्यंत मर्यादित आहे. Kushaq कारची किंमत ११.८९ लाख रुपयांपासून सुरु होते. तर Slavia च्या एक्स शो रुमची किंमत ११.५३ लाख रुपयांपासून सुरु होते.

टोयोटा कारवर ७५ हजार रुपयांची सूट

टोयोटा अर्बन क्रुझर Hyryder कार खरेदी करायचा विचार करत असाल तर तुम्ही ७५ हजार रुपयांची बचत करू शकता. Hyryder ची किंमत ११.१४ लाखांपासून सुरु होत आहे. Glanza कार खरेदी करायचा विचार करत असाल तुम्ही ५३,५०० रुपयांची बचत करू शकता. या कारची किंमत ६.८६ लाखांपासून सुरु होते.

Car
Business Idea: कमी खर्चात सुरु करा 'हा' बेस्ट बिझनेस अन् कमवा बक्कळ पैसे

महिंद्राच्या कार खरेदीवर मोठी सूट

मार्च महिन्यात महिंद्राने कार खरेदीवर १.५७ लाखांची मोठी सूट ऑफर केली आहे. या ऑफरचा लाभ फक्त मार्च महिन्यामध्येच घेऊ शकता. कंपनी XUV 400, Bolero Neo, Bolero, XUV 700 XUV 300 कारवर देखील सूट देत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com