Startup Business Idea : टी-शर्ट प्रिंटिंगच्या व्यवसायातून करा बक्कळ कमाई, जाणून घ्या सविस्तर

T-shirt Printing Business Details in Marathi: सध्याच्या काळात टी-शर्ट प्रिंटिंगचा व्यवसाय लाखोंची कमाई करून देणारा ठरत आहे. कॉलेजमधील तरुण-तरुणी, महिला, नोकरदार वर्ग,ज्येष्ठ नागरिक अशा सर्वच वर्गातील लोकांना टी-शर्टची आवड असते.
Startup Business Idea: T-shirt Printing Business Details in Marathi
Startup Business Idea: T-shirt Printing Business Details in Marathi Saam tv

T-Shirt Printing Business in Marathi :

सध्याच्या काळात टी-शर्ट प्रिंटिंगचा व्यवसाय लाखोंची कमाई करून देणारा ठरत आहे. कॉलेजमधील तरुण-तरुणी, महिला, नोकरदार वर्ग,ज्येष्ठ नागरिक अशा सर्वच वर्गातील लोकांना टी-शर्टची आवड असते. स्वत:चे नावाचे प्रिटिंग असललेले टी-शर्ट आवडणाराही मोठा वर्ग आहे. या टी-शर्ट प्रिटिंगच्या व्यवसायातून चांगली कमाई होऊ शकते. (Latest Marathi News)

Startup Business Idea: T-shirt Printing Business Details in Marathi
Parenting Tips | हट्ट पूर्ण केला नाही की मुलं चिडतात-उलटं बोलतात? 'या' गोष्टी करा

बाजारात टी-शर्ट प्रिंटिंगची मोठी मागणी आहे. काही टी-शर्ट पॅटर्नवर वेगवेगळ्या डिझाईनही पाहायला मिळते. आता छोट-छोट्या शहरातही या टी-शर्ट प्रिटिंगचे व्यवसाय प्रसिद्ध होऊ लागले आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Startup Business Idea: T-shirt Printing Business Details in Marathi
Business Idea In Marathi: अवघ्या २० हजार रुपयांच्या भांडवलात सुरु करा व्यवसाय; होईल तगडी कमाई, जाणून घ्या

व्यवसाय कसा सुरु कराल?

तुम्ही टी-शर्ट प्रिटिंगचा व्यवसाय घरातूनही सुरु करू शकता. तसेच दुकानातूनही हा व्यवसाय सुरु करू शकता. या व्यवसायासाठी तुम्हाला टी-शर्ट प्रिटिंग मशीन घ्यावी लागेल.

या व्यवसायात ग्राहक स्वत: या व्यवसायात टी-शर्ट प्रिटिंगच्या ऑर्डर देतात. ग्राहकांच्या आवडीच्या डिझाईननुसार टी-शर्ट प्रिटिंग करावी लागते. मात्र, आपल्याला यासाठी टी-शर्ट खरेदी करावी लागेल. तुम्हाला या खरेदी केलेल्या टी-शर्टवर प्रिटिंग करावी लागते.

किती भांडवल लागते?

टी-शर्ट प्रिटिंगचा व्यवसाय सुरु करण्यासाठी २० ते २५ हजारांची गरज लागते. टी-शर्ट प्रिटिंगची दहा ते पंधरा हजार रुपयांमध्ये येते. तसेच दुकान घेत असाल तर तुम्हाला फर्निचरसाठीही खर्च करावा लागेल.

Startup Business Idea: T-shirt Printing Business Details in Marathi
Business Idea In Marathi: नोकरी सोडा अन् ५० हजारात सुरु करा व्यवसाय; लाखोंची होईल कमाई, जाणून घ्या सविस्तर माहिती

फायदा काय?

टी-शर्ट प्रिटिंगच्या व्यवसायातून चांगली कमाई करू शकता. या व्यवसायासाठी टी-शर्ट प्रिटिंग मशीनही खरेदी केली, तरी त्याला जास्त पैसे मोजावे लागत नाही. त्यामुळे कमी भांडवलात अधिक कमाई करू शकता. एक टी-शर्ट प्रिंटिग करण्यास १०० ते २०० रुपये आकारू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com