Shraddha Thik
लहान मुलांना एखादी गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे घडली नाही तर ते फारच हट्ट करतात. या रागाच्या भरात मुलं उलटं बोलयला लागतात.
रागवणाऱ्या मुलांना वेळीच आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकवलं तर पुढे जास्त त्रास होत नाही.
राग ही भावना व्यक्त करण्याचे माध्यम आहे. पण अनेकांना राग इतका वाढतो की यामुळे नात्यावर चुकीचा परिणाम होतो.
अशावेळी पालकांची जबाबदारी असते की मुलांच्या रागावर त्यांना नियंत्रण ठेवता यायला हवं.
मुलांच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या तर त्यांना सवय लागते आणि इच्छा पूर्ण न झाल्यास ते राग राग करतात. म्हणून त्यांना सुरूवातीपासूनच आवश्यक असतील त्याच गोष्टी घेऊन द्या.
रागात तुम्ही मुलांना काहीही बोलाल तर ते तेच लक्षात ठेवतील. मुलांचा राग शांत करण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे त्यांच्याशी प्रेमाने बोला.
अग्रेसिव्ह मुलांना एकटे सोडू न देता त्यांना मिठी मारा, मुलांचा हात हातात घ्या, त्यांना प्रेमाने समजावा. पण जर मुलं मोठी झाली असतील तर राग कंट्रोल करण्यासाठी त्यांना वेळ दया आणि शांत होण्यासाठी वेळ द्या.