Shraddha Thik
दह्यामध्ये चांगले बॅक्टेरिया आणि प्रोबायोटिक्स भरपूर असतात. त्यात कॅल्शियमही मुबलक प्रमाणात आढळते. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
लहान मुले असोत की मोठी, सर्वांनाच दही खायला आवडते. काही लोक दही साखर घालून खातात तर काहीजण मीठ घालून.
जेवताना बहुतेक लोक मीठ मिसळून दही खातात. पण खरंच मीठ मिसळून दही खावं का?
दह्यामध्ये कॅलरीज मुबलक प्रमाणात आढळतात. प्रथिने, व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, फॉस्फरस आणि लैक्टोज यांसारखे पोषक घटक देखील त्यात आढळतात.
रोज दह्यामध्ये मीठ मिसळून खाल्ल्यास पित्त आणि कफाचा त्रास वाढू शकतो. दह्यात हलके जिरे खाऊ शकता.
आहारतज्ज्ञांच्या मते दह्यामध्ये चांगले बॅक्टेरिया आढळतात, पण मीठ टाकल्याने त्यात असलेले बॅक्टेरिया नष्ट होऊ लागतात.
दह्यात मीठ टाकल्याने तुमच्या पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो. यामुळे गॅस आणि ब्लोटिंगची समस्या उद्भवू शकते.