Shraddha Thik
वाढत्या वयाबरोबर त्वचा लूज आणि सुरकुत्या पडू लागते. जेव्हा त्वचेमध्ये कोलेजन कमी होऊ लागते तेव्हा त्वचा लूज पडते.
यासाठी, लोक सहसा कॉस्मेटिक उपचारांचा पर्याय निवडतात, जे महाग असतात आणि त्याचे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात.
त्वचा टाईट करण्यासाठी तुम्ही काही घरच्या वस्तूंचा उपयोग करून त्वचेची काळजी घेऊ शकता.
अँटिऑक्सिडंट वाढत्या वयाचा प्रभाव कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. कॉफीमध्ये अँटिऑक्सिडंट गुण आढळतात.
कोरफड जेल हे त्वचेसाठी उत्तम मानली जाते. त्वचेच्या कोणत्याही समस्या असतील तर कोरफड जेलचा वापर करणं सोयीस्कर ठरते. कोरफडमध्ये अनेक प्रकारचे फाईटोकेमिकल्स आढळता.
त्वचा अधिक कसदार होण्यासाठी तुरटीचा चांगला फायदा मिळतो. कारण यामध्ये अँटिपर्सपिरेंट्स असल्याने त्वचा अधिक कसदार होते. यामध्ये अल्युमिनिअम, जिंक आणि मँगनीज याचा मेळ असल्याने त्वचेला अधिक टाईट ठेवण्यास फायदेशीर ठरते.
त्वचा टाईट होण्यासाठी तुम्ही टॉमेटोचाही उपयोग करून घेऊ शकता. टॉमेटोमध्ये विटामिन सी असते, जे त्वचेला अधिक उजळ बनविण्याचे आणि त्वचा अधिक टाईट करण्याचे काम करते.